IPL Auction 2025 Live

Mantralaya Suicide: मंत्रालयात खळबळ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवींसाच्या कार्यालया बाहेर तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Mantralay PC Wikimedia Commons

 Mantralaya Suicide: मदती मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या तरुणाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर धक्कादायक प्रकार केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलायाबाहेर साताऱ्याहून आलेल्या तरुणाने 2 ऑगस्टला आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या धक्कादायक घटनेमुळे मंत्रालय परिसरात खळबळ उडाली आहे.  तरुणाने स्वत:वर धारदार ब्लेडनं वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणांना ताब्यात घेत रुग्णालात दाखल केले.

सुरेश जगपात असं या तरुणांच नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे सांगितले जात आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण कर्जबाजारीपणाला कंटाळून मदत मागण्यासाठी मंत्रालयात आला होता. मंत्रालयात कोणीही बघत नसल्याचा आरोप करत त्यांने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आत्महत्या केली.  पोलीसांनी तात्काळ घटनास्थली घाव घेत तरुणाला रुग्णायलयात दाखल केले.

मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीसांनी या संदर्भात चौकशी सुरु केली आहे. सुरेश जगताप यांनी कार्यालयात कोणीही लक्ष देत नव्हता असा आरोप करत कार्यलयाच्या बाहेर स्वत:च्या डाव्या मनगटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लक्ष देत पोलीसांना फोन केला. पोलीस घटनास्थळी धाव घेत तरुणाला जीटी रुग्णालयात दाखल केले. मंत्रालयाच्या परिसरात खळमबळ उडाली आहे. तरुणाला गंभीर जखमा न झाल्याचे समोर आले आहे.