Photo Credit- X

Maharashtra Lottery Results: वैभवलक्ष्मी (Vaibhavalakshmi), महा. गजलक्ष्मी शुक्र (Maha. Gajalakshmi Shukra),गणेशलक्ष्मी धन (Ganeshlakshmi Dhan), महा. सह्याद्री राजलक्ष्मी (Maha. Sahyadri Rajalakshmi) लॉटरींची सोडत आज शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे जर तुम्ही लॉटरी खेरदी करत असाल तर, वर संकेतस्थळावर तुम्ही खरेदी केलेली लॉरटी चेक करू शकता. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)

तुमचा लॉटरी क्रमांक पाहून तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा. ज्यानेकरून तुम्हाला तुमचे बक्षिस मिळेल. ही लॉटरी राज्य सरकार संचालित विश्वासार्ह आहे. या आधी राज्यातील तरुणाई मटका, जुगार ह्या व्यसनांच्या आहारी गेली होती. त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलत महाराष्ट्र राज्य लॉटरीची स्थापना केली.

जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.