Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
गेल्या 52 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य लॉटरीने आपले बोधवाक्य् ‘गौरवशाली आणि विश्वा्सार्ह’ सत्यात उतरविले आहे. प्रत्येक सोडत जाहीर रित्या पंच मंडळासमोर केली जाते.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी (Maharashtra Lakshmi), महा.गजलक्ष्मी शनि (Maha Gajalakshmi Shani), गणेशलक्ष्मी समृद्धी (Ganeshlakshmi Gaurav), महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी (Maha Sahyadri Draupalaxmi) लॉटरींची सोडत आज शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर होणार आहे. लॉटरी निकाल हा lottery.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लागतो. दररोज दुपारी 4 वाजून 15 मिनीटांनी निकाल जाहीर केला जातो. त्यानंतर प्रत्येक पंधरा मिनीटांच्या अंतराने उर्वरित लॉटरी जाहीर केल्या दातात. आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये महाराष्ट्रलक्ष्मी लॉटरीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा.गजलक्ष्मी गुरू ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत. (हेही वाचा: Maharashtra State Lottery: महाराष्ट्र राज्य लॉटरी प्रकार आणि सोडतीचे वार; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून)
आयुष्यात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे. जर तुम्ही विजेते असाल तर तुम्हाला बक्षिस मिळण्यासाठी काही गोष्टींची माहिती असणे महत्त्वाचे आहे. लॉटरींचे बक्षिस मिळण्यासाठी काही कागदपत्रांची गरज असते. तुमचा क्रमांक भाग्यवान विजेत्यांमध्ये असल्यास तिकीटाच्या मागे असलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क करावा. त्याशिवाय, Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरा. यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणं आवश्यक असते.सोबत 2 साक्षीदारांची माहिती देणं आवश्यक आहे.
सोडतीचे क्रमांक विद्युत यंत्राद्वारे किंवा ड्रममधून निवडले जातात. अशा रितीने सोडती पारदर्शक आणि विश्वासार्ह असतात. लॉटरीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग सरकार राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सरकारकडून केला जातो. यात शिक्षण, आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी या पैशांचा वापर होतो.
(The above story first appeared on LatestLY on Sep 14, 2024 02:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

