महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live News Updates: महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप-शिवसेना युतीचा विजयी

एक्झिट पोलनुसार, देशात एनडीएला सत्ता मिळू शकते असे चित्र समोर आले. त्यामुळे देशात पुन्हा मोदी सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

24 May, 24:49 (IST)

महाराष्ट्र लोकसभा निकाल 2019 विजेयी उमेदवार

अहमदनगर - सुजय विखे

अकोला - संजय धोतरे

अमरावती - नवनीत राणा

औरंगाबाद - इम्तियाज जलील

बारामती - सुप्रिया सुळे

बीड - प्रीतम मुंडे

भंडारा गोंदिया - सुनील मेंढे

भिवंडी - कपिल पाटील

बुलढाणा - प्रतापराव जाधव

चंद्रपूर - सुरेश धानोरकर

धुळे - सुभाष भामरे

दिंडोरी - भारती पवार

गडचिरोली - अशोक नेते

हातकंगणे - धैर्यशील माने

हिंगोली - हेमंत पाटील

जळगाव - उमेश पाटील

जालना - रावसाहेब दानवे

कल्याण - श्रीकांत शिंदे

कोल्हापूर - संजय महाडिक

लातूर - सुधाकर शृंगारे

माढा - रणजीतसिंह निंबाळकर

मावळ - श्रीरंग बारणे

मुंबई साऊथ - अरविंद सावंत

मुंबई नॉर्थ - गोपाल शेट्टी

मुंबई नॉर्थ सेंट्रल - पूनम महाजन

मुंबई नॉर्थ ईस्ट - मनोज कोटक

मुंबई नॉर्थ वेस्ट - गजानन कीर्तिकर

मुंबई साऊथ सेन्ट्रल - राहुल शेवाळे

नागपूर - नितीन गडकरी

नांदेड - प्रतापराव चिखलीकर

नंदुरबार - हिना गावीत

नाशिक - हेमंत गोडसे

उस्मानाबाद - पवनराजे निंबाळकर

पालघर - राजेंद्र गावित

परभणी - संजय जाधव

पुणे - गिरीश बापट

रायगड - सुनील तटकरे

रामटेक - कृपाल तुमाणे

रत्नागिरी - विनायक राऊत

रावेर - रक्षा खडसे

सांगली - संजय पाटील

सातारा - श्रीमंत  छत्रपती उदयनराजे

शिर्डी - सदाशिव लोखंडे

शिरूर - अमोल कोल्हे

सोलापूर - जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजीं

ठाणे - राजन विचारे

वर्धा - रामदास तडस

यवतमाळ - भावना गवळी

24 May, 24:09 (IST)

मराठीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.

23 May, 23:48 (IST)

पराभव मी खुल्या दिलाने स्वीकारतो, असे अशोक चव्हाण म्हणाले. तसंच त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाता जोमाने विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन केले आहे.

23 May, 23:16 (IST)

'लाव रे ते फटाके' म्हणत उद्धव ठाकरे यांनी विजयावर प्रतिक्रीया दिली. तर मातोश्रीवर दाखल झालेल्या फडणवीस, आठवले यांनीही आपले मत मांडले. आठवले यांनी खास कविताही सादर केली. 

23 May, 23:07 (IST)

महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना युतीला लोकसभा निवडणूकीत दिलेल्या प्रतिसादाबद्दल भाजपने ट्विट करुन आभार मानले आहेत.

23 May, 22:44 (IST)

शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा विजय.

23 May, 22:36 (IST)

शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांचा पराभव करत साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उदयनराजे भोसले विजयी झाले.

23 May, 22:25 (IST)

यंदाचा लोकशाहीचा निकाल हा अनाकलनीय अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालावर आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. 

तरी देखील राज ठाकरे अजून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

23 May, 22:18 (IST)

भाजप-शिवसेना युतीच्या दमदार विजयानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे आणि रामदास आठवले 'मातोश्री'कडे रवाना झाले आहेत.

23 May, 21:57 (IST)

स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांचा पराभव करुन शिवसेनेचे धैर्यशील माने विजयी ठरले आहेत.

23 May, 21:48 (IST)

उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या विजयावर उर्मिला मातोंडकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसंच त्यांनी मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानले. 

23 May, 21:34 (IST)

50 वर्षात जितके काम झाले नाही तितके पाच वर्षात मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली झाले. तसंच त्यांनी विजयानिमित्त नागपूरच्या जनतेचे आभार मानले. जनतेचा कौल खुल्या मनाने स्वीकारणे याला लोकशाही म्हणतात. मी विरोधी पक्षातही काम केले आहे. लोकशाहीच्या उत्सवात लोक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. आम्ही सर्व स्तरात चांगले काम केले, यापुढेही करत राहू, असे आश्वासनही त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.

23 May, 21:24 (IST)

काँग्रेस पक्षाचे सुरेश पडवी यांना पराभूत करत शिवसेनेचे राजेंद्र गावित विजयी.

23 May, 21:04 (IST)

रत्नागिरी सिंधुदूर्गात राणे कुटुंबियांना मोठा धक्का. स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांना पराभूत करत शिवसेनेचे विनायक राऊत विजयी.

23 May, 21:00 (IST)

पुण्यातही भाजपचा झेंडा रोवण्यात गिरीश बापट यांना यश आले आहे. काँग्रेसचे मोहन जोशी यांचा पराभव करत पुण्यात गिरीश बापट विजयी.

23 May, 20:48 (IST)

अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. प्रकाश आंबेडकर यांना पराभूत करत भाजपचे संजय धोत्रे विजयी झाले आहेत. 

23 May, 20:19 (IST)

भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव केला आहे. बालेकिल्ल्यात अशोक चव्हाण यांचा 50000 मतांनी पराभव.

23 May, 20:15 (IST)

शिरुर येथून शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव पाटील यांना पराभूत करत राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले आहेत. 

23 May, 20:08 (IST)

काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांचा पराभव करत जालन्यातून रावसाहेब दानवे यांनी भाजपचा विजयी झेंडा रोवला.

23 May, 20:03 (IST)

मावळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबियांना मोठा धक्का. पार्थ पवार यांचा 2 लाख मतांनी दारुण पराभव. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी राखला मावळचा किल्ला. 

Read more


देशात गेल्या महिन्याभरापासून लोकसभा निवडणूकांची (Loksabha Elections 2019) धामधूम होती. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान पार पडले. 19 मे रोजी एक्झिट पोलचे कल हाती आल्यानंतर आज निवडणूकांच्या निकालाची देशभरात उत्सुकता आहे. 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर जनतेचा कल हळूहळू हाती येऊ लागतील. एक्झिट पोलनुसार, देशात एनडीएला (NDA) सत्ता मिळू शकते असे चित्र समोर आले. त्यामुळे देशात पुन्हा मोदी सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र एक्झिट पोलचे हे अंदाज कितपत खरे ठरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशात पहिल्या टप्प्यात 20 राज्यांतील 91 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 14 राज्यांतील 97 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 राज्यातील 115 मतदारसंघ, चौथ्या टप्प्यात 9 राज्यांतील 71 मतदारसंघ, पाचव्या टप्प्यात 7 राज्यांत 51 मतदारसंघ, सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 मतदारसंघात आणि सातव्या टप्प्यात 8 राज्यातील 59 मतदासंघात मतदान झाले. (लोकसभा निवडणुक 2019 चे Live निकाल कंप्युटर आणि मोबाईलवर 'या' पद्धतीने पाहा)

तर महाराष्ट्रात 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल या चार दिवसात चार टप्प्यातील मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात राज्यातील 7 मतदारसंघ, दुसऱ्या टप्प्यात 19 मतदारसंघ, तिसऱ्या टप्प्यात 14 मतदारसंघात तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 मतदारसंघांमध्ये मतदान झाले. महाराष्ट्रात चार टप्प्यात मिळून एकूण 60.67% मतदान झाले आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now