Maharashtra Legislative Council Election 2020: भाजप उमेदवार प्रविण दटके, गोपीचंद पडळकर, अजित गोपछडे, रणजितसिंह मोहिते पाटील यांची राजकीय कारकीर्द

भाजपने विधान परिषदेसाठी या वेळी उमेदवार म्हणून नवे चेहरे दिले आहेत. त्यामुले भाजपमध्ये निष्ठावंतांचे काय? तसेच ज्येष्ठांना संधी मिळणार तरी कधी असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे.

BJP candidates | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Maharashtra Legislative Council Election 2020: विधानपरिषदेतही निवडणूक 2020 मध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विनोद तावडे (Vinod Tawde), चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांऐवजी तुलनेत किततरी नवख्या असलेल्या प्रविण दटके (Pravin Datke), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), अजित गोपछडे (Ajit Gopchade) आणि रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांना भाजपने उमेदवारी दिली. इतक्या ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारुन तरुण चेहऱ्यांना संधी दिल्याने भाजपचे हे चारही उमेदवार जोरदार चर्चेत आले आहेत. त्यामुळे भाजपच्या या चार उमेदवारांच्या एकूण राजकीय वाटचालीचा हा एक छोटासा आढावा.

प्रविण दटके

प्रविण दटके हे मूळचे नागपूरचे. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे अत्यंत निकटचे संबंध असणे स्वाभाविकच. तसेच, प्रविण दटके यांची राजकीय कारकीर्द पाहता ते फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांच्यावर नागपूर (शहर) भाजपची जबाबदारी आहे. त्यांनी नागपूरचे महापौर पदही सांभाळले आहे. देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात येत असल्याबद्धल दटके यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी ट्रोलर्सवर कडक कारवाईक करण्याची मागणी केली होती. (हेही वाचा, विधान परिषद निवडणूक केवळ निमित्त; खडसे, मुंडे, तावडेंचा पत्ता कापून देवेंद्र फडणवीस आणि भाजपची नवी रणनिती)

गोपीचंद पडळकर

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी सारख्या अत्यंत छोट्या गावातून संघर्ष करणारा हा तरुण मुलगा. मोठ्या संघर्षाने राजकारणात आला. ग्रामीण भागात त्याने आपला विशेष प्रभाव निर्माण केला. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून (रासप) राजकारणास सुरुवात केली. पुढे रासप सोडून ते भाजपमध्ये आले. विधानसभा निवडणूक 2014 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे खानापू-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होते. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे लोकसभा निवडणूक 2019 मध्ये ते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुनज आघाडीतर्फेर लढले. यातही ते पराभूत झाले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार पडळकर यांनी विधानसभा निवडणूक 2019 मध्ये बारामती येथून अजित पवार यांच्या विरोधात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. त्यात त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. आता त्यांना भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील

रणजितसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे माढ्याचे तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र. रणजितसिंह हे 2009 ते 20012 या काळात राज्यसभा खासदार होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष राहिले आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. विधानपरिषदेत त्यांनी सोलापूर विभागाचं प्रतिनिधित्त्व त्यांनी या आधीही केले आहे. (हेही वाचा, Maharashtra Legislative Council Elections 2020: महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपने जाहीर केली उमेदवार यादी; एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना वगळलं)

अजित गोपछडे

अजित गोपछडे हे पेशाने डॉक्टर. बालरोग तज्ज्ञ अशी त्याची ख्याती. भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रदेश संयोजक ते सांभाळतात. त्यांच्या रुपाने भाजपने वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिला विधिमंडळात प्रतिनिधित्व दिल्याचे सांगता येणार आहे. गोपछडे यांची राजकीय कारकीर्द विशेष अशी सांगता येत नाही.

दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी या वेळी उमेदवार म्हणून नवे चेहरे दिले आहेत. त्यामुले भाजपमध्ये निष्ठावंतांचे काय? तसेच ज्येष्ठांना संधी मिळणार तरी कधी असा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांना संधी नाकारली. त्यांना तिकीटच दिले नाही. यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे यांचा समावेश होता. विशेष म्हणजे हे सर्वजन फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now