Covid-19: जामखेड तालुक्यात माक्सशिवाय घराबाहेर पडणाऱ्या चौघाविरोधात गुन्हा दाखल

पोलीस-प्रातिनिधिक प्रतिमा | (PTI photo)

कोरोना विषाणूचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न केला जात आहे. कोरोना विषाणूचा नियंत्रण मिळवण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत केला आहे. मात्र, काही ठिकाणी नागरिक अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडत आहेत. यामुळे घराबाहेर पडताना प्रत्येक नागरिकांना तोंडावर मास्क लावणे सक्तीचे केले आहे. यातच जामखेड (Jamkhed) तालुक्यात तोंडावर मास्क न लावता घराबाहेर पडणे 4 जाणांना महागात पडले आहे. संचारबंदीचे उल्लंघन आणि तोंडावर मास्क न लावण्याने पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विनाकारण आणि मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यावर प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आहेत. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावामुळे आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी पुढील काही दिवस विनाकारण, माक्सशिवाय घराबाहेर पडू नये. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय, लॉकडाउनच्या काळात लागू असलेल्या कायद्याचे कोणीही उल्लंघन करण्याच्या प्रयत्न केल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मात्र, जामखेड तालुक्यात मास्क न लावता फिरणाऱ्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात आज दिवसभरात 221 कोरोना बाधित रुग्णांची वाढ तर 22 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1982 वर पोहोचली

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. देशात संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी लोक खरेदी किंवा इतर कारणांमुळे घराबाहेर पडत आहेत. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवरही कारवाई केली जात आहे.