Maharashtra Interim Budget 2024 Highlights: महिलांना 'पिंक रिक्षा' ते अयोध्या, पायाभूत सुविधा ते उद्योगांवर भर; पहा अर्थमंत्र्यांकडून आज अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा!

तसेच दावोस मध्ये जानेवारी 2024 मध्ये 19 कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

Budget 2024 | Twitter

महायुती सरकार मध्ये आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थसंकल्प (Interim Budget) मांडला आहे. आजच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अजित पवारांनी राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि उद्योगांवर भर देण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळेस त्यांनी केंद्राकडून जीएसटीचे  8 हजार 618 कोटींचा परतावा मिळाल्याची माहिती दिली आहे. तसेच दावोस मध्ये  जानेवारी 2024 मध्ये 19 कंपन्यांसोबत करार झाला असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. यंदा १०वा अर्थसंकल्प सादर करणार आहे. Maharashtra Interim Budget 2024 Live Streaming: अर्थमंत्री अजित पवार सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प; इथे पहा लाईव्ह .

महाराष्ट्र अंतरिम अर्‍थसंकल्प 2024 मधील महत्त्वाच्या घोषणा  

दरम्यान आज अर्थसंकल्पामध्ये अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र सरकार कडून 2023 मध्ये, एकनाथ शिंदे-भाजप सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 5,47,450 कोटी रुपयांचा पहिला अर्थसंकल्प सादर केला, जो “पंचामृत” तत्त्वावर आधारित होता. आजचा अर्थ संकल्प अंतरिम होता.