शिवरायांच्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असलेला वादग्रस्त व्हिडिओ हटवण्याची महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची YouTube कडे मागणी
सोशल मीडियावर या वादग्रस्त व्हिडिओवरून चर्चा रंगल्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी युट्युब (YouTube) कडे ही वादग्रस्त क्लिप हटवण्याची मागणी केली आहे.
मागील आठवड्यामध्ये 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचा वाद निवळल्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या चेहर्याच्यावर नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) फोटो मॉर्फ करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. सोशल मीडियावर या वादग्रस्त व्हिडिओवरून चर्चा रंगल्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी युट्युब (YouTube) कडे ही वादग्रस्त क्लिप हटवण्याची मागणी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज तर अमित शाह यांना तान्हाजी रूपात दाखवणारा Video Viral; नेटकरी भडकले!
वादग्रस्त व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शाह आणि दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभान राठोड यांच्या रूपात दाखवण्यात आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी व अमित शहा हे दिल्लीसाठी कोंढाणा किल्ल्याप्रमाणे युद्ध करायला तयार आहेत, 'शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे,’ असे संवादही आहेत. त्यामुळे नेटकर्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील यावर निषेध नोंदवला आहे. कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये: संभाजीराजे छत्रपती.
ANI Tweet
सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणारा अजय देवगणचा तान्हाजी: द अनसंग वॉरिअर (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटातील काही सीन्सना एकत्रित करून वादग्रस्त व्हिडिओ बनवण्यात आला आहे.