सातारा जिल्हयातील वाई विधानसभा मतदारसंघात महाबळेश्वर पश्चिम तालुक्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शेलार यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुका प्रमुख संजय शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर पश्चिम तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला आहे.
Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021 Live Update: महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा
Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021 Live Update: महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणुकीचा निकाल ( Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021) आज (18 जानेवारी 2021) पार पडत आहे.
Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021 Live Update: महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणुकीचा निकाल ( Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021) आज (18 जानेवारी 2021) पार पडत आहे. निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले होते. महाराष्ट्रात एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या एकूण 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी निवडणूक पार पडली. या जागांसाठी निवडणूक आयोगाकडे तब्बल 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी काहींनी स्वत:हून अर्ज मागे घेतले. तर काहींचे अर्ज छाननीत बाध झाले त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 2 लाख 41 हजार 598 उमेदवार उतरले. त्यातही पुन्हा जवळपास 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहेत. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 2 लाख 14 हजार 880 उमदेवरांसाठी मतदान पार पडले.
दरम्यान, महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदान पार पडेल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली आहे. एकूण निवडणुकांपैकी काही गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे या ठिकाणी निवडणूका पार पडल्या नाहीत. तर काही एक दोन ठिकाणी निवडणुकीत आक्षेपार्ह गोष्टी घडल्याचे पुढे आल्याने निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुका रद्द ठरवल्या.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या दोन ग्रामपंचायतिंची निवडणूक रद्द करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच आणि सद्य पदासाठी लिलाव घेण्यात आला. या ठिकाणी सरपंच पदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली. या लिलावाची राज्यभर चर्चा रंगली. प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेचे सकृतदर्शनी पुरावे आढळल्याने दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections Results 2021: ग्रामपंचायत निवडणूक निकाल, गावगाड्यात कुणाचं वर्चस्व? आज चित्र होणार स्पष्ट)
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अद्याप बाकी आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रर्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांत येणाऱ्या 162 ग्रामपंचायतींसाठी येत्या 20 जानेवारी 2021 या दिवशी मतदान पार पडत आहे, अशी माहितीही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 18 जानेवारी 2021 या दिवशी होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत (आजच्या आणि 20 जानेवारीला होणाऱ्या मतदानाची) निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जानेवारी या दिवशी पार पडणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)