Maharashtra Gram Panchayat Elections 2021: राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 12 हजार 711 गावांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79% मतदान
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रर्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांत येणाऱ्या 162 ग्रामपंचायतींसाठी येत्या 20 जानेवारी 2021 या दिवशी मतदान पार पडत आहे, अशी माहितीही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली.
महाराष्ट्रात 34 जिल्ह्यांपैकी एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी सुमारे 12, 711 गावांतील ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक (Maharashtra Gram Panchayat Elections 2021) पार पडली. या निवडणूकीत एकूण 79% मतदान झाले. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आणि फक्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदान पार पडेल, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली आहे. एकूण निवडणुकांपैकी काही गावच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे या ठिकाणी निवडणूका पार पडल्या नाहीत. तर काही एक दोन ठिकाणी निवडणुकीत आक्षेपार्ह गोष्टी घडल्याचे पुढे आल्याने निवडणूक आयोगाने या ठिकाणच्या निवडणुका रद्द ठरवल्या.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या दोन ग्रामपंचायतिंची निवडणूक रद्द करण्यात आली. या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सरपंच आणि सद्य पदासाठी लिलाव घेण्यात आला. या ठिकाणी सरपंच पदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लागली. या लिलावाची राज्यभर चर्चा रंगली. प्रसारमाध्यमांनीही याबाबत वृत्त दिले. त्यानंतर निवडणूक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. निवडणूक अधिकाऱ्यांना घडल्या प्रकाराची चौकशी करण्यास सांगितले. या घटनेचे सकृतदर्शनी पुरावे आढळल्याने दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक रद्द करण्यात आली. (हेही वाचा, Maharashtra Gram Panchayat Elections 2021: ग्रामपंचात निवडणुकीसाठी 14 हजार 234 गावांमध्ये मतदानन संपन्न; सर्वांना 18 जानेवारीच्या मतमोजणीची उत्सुकता)
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका अद्याप बाकी आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या क्रर्यक्रमानुसार गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यांत येणाऱ्या 162 ग्रामपंचायतींसाठी येत्या 20 जानेवारी 2021 या दिवशी मतदान पार पडत आहे, अशी माहितीही राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस मदान यांनी दिली.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी येत्या 18 जानेवारी 2021 या दिवशी होणार आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत (आजच्या आणि 20 जानेवारीला होणाऱ्या मतदानाची) निवडणुकीसाठीची मतमोजणी 22 जानेवारी या दिवशी पार पडणार आहे.
महाराष्ट्रात एकूण 14,234 ग्रामपंचायतींच्या एकूण 1 लाख 25 हजार 709 जागांसाठी निवडणूक पार पडली. या जागांसाठी निवडणूक आयोगाकडे तब्बल 3 लाख 56 हजार 221 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी काहींनी स्वत:हून अर्ज मागे घेतले. तर काहींचे अर्ज छाननीत बाध झाले त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 2 लाख 41 हजार 598 उमेदवार उतरले. त्यातही पुन्हा जवळपास 26 हजार 718 उमेदवार बिनविरोध निवडले जाणार आहे. त्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे प्रत्यक्षात 2 लाख 14 हजार 880 उमदेवरांसाठी मतदान पार पडले.
कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी पार पडले मतदान?
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.