कोरोना व्हायरस संकटात PM-CARES च्या धर्तीवर महाराष्ट्रात CSR Donations साठी नवं खातं सुरू; उद्योजक, व्यावसायिकांनी मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन

आता महाराष्ट्र राज्यामध्येही "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण " या नावाने स्वतंत्र बॅंक खातं उघडून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray | (File Photo)

कोरोना व्हायारसचं संकट हे केवळ आता जागतिक आरोग्य संकट राहिलेले नसून त्याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेलाही बसत आहे. सोबतच लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्यांसाठी अनेक गोर गरिबांना मदतीचा हात पुढे यायला सुरूवात झाली आहे. मात्र कोरोनाचा वाढता विळखा पाहता आता उद्योजक, व्यावसायिकांनी पुढे येऊन मदत करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान CSR वरून राज्य आणि केंद्र सरकारच्या फंडातील मदतीबाबत मतभेद होते. मात्र आता महाराष्ट्र राज्यामध्येही "महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण " या नावाने स्वतंत्र बॅंक खातं उघडून उद्योजक, व्यावसायिकांनी या निधीत सामाजिक दायित्व निधीमधून (CSR) उदारपणे योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोना व्हायरस जागतिक आरोग्य संकटासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत महाराष्ट्र शासनास मदत देण्यासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. या विनंतीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण " या नावाने स्वतंत्र बॅंक खाते स्टेट बैंक ऑफ इंडिया, कुलाबा,मुंबई येथे उघडले आहे. आपत्तीचा सामना समर्थपणे करण्यासाठी हा निधी/फंड राज्यास निश्चितपणे उपयक्त ठरेल. उदयोगांचे सामाजिक दायित्व निधी (Corporate Social Responsibility) मधून उद्योग जगताकडून भरघोस निधी या खात्यामध्ये देणगीव्दारे जमा करावा असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे. या खात्यामध्ये जमा करण्यात येणारा निधी कंपनी अधिनियम, 2013 मधील तरतुदीनुसार सीएसआर साठी पात्र आहे.

बँक खात्याचा तपशील

खात्याचे नाव :- महाराष्ट स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी

बँक खाते क्रमांक :- 39265578866

बँकेचे नाव :- स्टेट बँक ऑफ इंडिया, वुड हाऊस रोड, कुलाबा, मुंबई .

ब्रँच कोड :- 572

आयएफएससी (IFSC) :- SBIN0000572

एमआयसीआर (MICR):- 400002087

दरम्यान काही दिवसंपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला आर्थिक पाठबळ उभं करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर समाजातील विविध घटकांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. यामध्ये सेलिब्रिटी, सामान्य नागरिक, कामगारांसह चिमुकल्यांचाही समावेश आहे. अनेकांनी पॉकेटमनी, खाऊचे पैसे, वाढदिवसाचे पैसे मदत म्हणून देऊ केले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif