महाराष्ट्र सरकारकडून मास्क आणि कोविड19 च्या चाचणीसाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्याचा प्रयत्न
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना सध्याच्या परिस्थिती मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर आणि मास्कची वाढती पाहता त्याच्या किंमतीत घट करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचसोबत कोविड19 च्या चाचण्यांचे दर सर्वसामान्यांना परवडणारे असावेत याबद्दल सुद्धा सरकारकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.(Coronavirus Update: कोरोना रुग्णसंख्या 9 लाखाच्या पार; महाराष्ट्रात तुमच्या जिल्ह्यात किती कोरोनाबाधित आहेत जाणुन घ्या)
सध्या RT-PCR च्या चाचणीसाठी सध्या 1900-2500 रुपये आकारले जातात. परंतु याचे दर 1200-1500 रुपयांपर्यंत होऊ शकतात. तसेच N95 मास्कची किंमत 150-300 रुपये असून त्यात सुद्धा 50 रुपयांची कपात केली जाऊ शकते. तसेच सॅनिटायझरच्या 200ml च्या कॅपसाठी 7 जुलै पर्यंत 100 रुपये आकारले जात होते.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राला पुन्हा एकदा मास्क आणि सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तूंमध्ये सामील करावे त्यामुळे त्याचे दर निश्चित करता येईल असे म्हटले आहे. तर सॅनिटायझर बनवणाऱ्या उत्पादकांसोबत चर्चा करुन त्यांना सुद्धा थोडा नफा व्हावा त्यानुसार आम्ही त्याचे दर ठरवू शकतो असे ही टोपे यांनी म्हटले आहे.(पुण्यात कोरोनाचा हाहाकार! 4447 नव्या रुग्णांसह जिल्ह्यात COVID-19 संक्रमितांची संख्या 1,93,013 वर)
दरम्यान, राज्यातील एकूणच कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात बोलायचे झाल्यास आकडा 9 लाखांच्या पार गेला आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. परंतु नियम आणि अटींचे पालन करावे असे आवाहन ही सरकार कडून करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह कोविड योद्धे सुद्धा सध्याच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोख बजावताना दिसून येत आहेत.