महाराष्ट्रातील शाळा 15 जून पासून अर्धा दिवस सुरु ठेवण्याचा राज्य सरकारचा विचार
तसेच या शाळा अर्धा दिवस सुरु ठेवण्याचा विचार देखील राज्य सरकार करत आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अशा स्थितीत जोपर्यंत कोरोनावर योग्य लस येत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही की लॉकडाऊन कधी पर्यंत चालेल वा लॉकडाऊन उठला तरीही देशात काय स्थिती असेल. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये म्हणून 15 जून नंतर शाळा (School) सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहेत. तसेच या शाळा अर्धा दिवस सुरु ठेवण्याचा विचार देखील राज्य सरकार करत आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी रेड झोन वगळता अन्य झोनमध्ये शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार 15 जूनपासून शाळा सुरु करण्यात येतील याबाबत विचार सुरु आहे. त्यामुळे हळूहळू शाळेचे ठिकाण लक्षात घेता लवकरच शाळा सुरु करण्याचा विचार सुरु आहे असे सांगण्यात येत आहे. राज्यातील 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘महा करिअर पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन; 66 लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा
22 मे नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन चे नियम शिथिल केले आहेत. तर दुसरीकडे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे आणि अन्य 15 शहरे रेड झोन म्हणून घोषित केले आहेत.
वर्षा गायकवाड यांनी इंडियन एक्सप्रेस ला दिलेल्या माहितीनुसार, "सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करत दोन शिफ्ट्समध्ये वर्ग ठेवण्यात येतील. त्यामुळे पूर्ण दिवस शाळा न ठेवता अर्धा दिवस शाळा ठेवण्याचा विचार आहे." यात प्रत्येक इयत्तेचे तास कमी वेळासाठी असून अर्धा दिवस असतील. या स्पोर्ट आणि अन्य अॅक्टिव्हिटीजचा समावेश नसेल.
रेड झोन मधील शाळा सुरु करणे हा मोठा धोका असल्या कारणाने त्यावर थोडा विचार करावा लागेल. महाराष्ट्रात कोरोनाचे नवे 2608 रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 60 जणांचा बळी गेला असून 821 जणांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 47910 वर पोहचला असून त्यापैकी 1577 जणांचा बळी गेला आहे. तसेच 13404 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.