MP Mohan Delkar Suicide Case चा तपास SIT मार्फत होणार: गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबईत डेलकर यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर आता त्यांच्या आत्महत्येप्राकरणी एसआयटी चौकशी (SIT) करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

Anil Deshmukh (Photo Credit: Twitter)

विधानसभेमध्ये आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे मोठा गदारोळ पहायला मिळाला आहे. विरोधकांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरणी पोलिस ऑफिसर सचिन वाझे यांच्या अटकेची, निलंबनाची मागणी केली आहे. दरम्यान त्याला प्रत्युत्तर देताना सत्ताधार्‍यांकडून दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर (MP Mohan Delkar) यांच्या आत्महत्येचं प्रकरण पुढे केले आहे. मुंबईत डेलकर यांनी एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर आता त्यांच्या आत्महत्येप्राकरणी एसआयटी चौकशी (SIT)  करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

आज विधानसभेमध्ये माहिती देताना खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची महाराष्ट्र सरकार SIT चौकशी कारणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान मोहन डेलकर हे दादरा नगर हवेलीचे 7 वेळा निवडून आलेले खासदार होते. फेब्रुवारी 2021 मध्ये दक्षिण मुंबईच्या एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं वृत्त धक्कादायक होते. अनेक वेळेस या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. हेदेखील वाचा- MP Mohanbhai Delkar Found Dead: खासदार मोहनभाई डेलकर यांचा मृत्यू; मुंबई येथे संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह.

ANI Tweet

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर त्याच्या खोलीचा तपास करण्यास आला होता. यावेळी पोलिसांना एक 15 पानी सुसाईड नोटीस सापडली आहे. या नोट मध्ये गुजरातीमध्ये काही लिहण्यात आलं असून काहींची नावं असल्याची चर्चा आहे. पण पोलिसांकडून या सुसाईट नोट आणि त्याच्यामधील नावांबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी तपासात मुंबई पोलिसांसोबत दादरा नगर हवेलीच्या अथॉरिटीने सहकार्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मदत मागणार असल्याचं म्हटलं आहे.