राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सरकार लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

त्यामुळे राज्याला कोणताच आर्थिक फायदा होत नाही आहे. याच कारणास्तव आता राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे राज्याला कोणताच आर्थिक फायदा होत नाही आहे. याच कारणास्तव आता राज्याला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच आर्थिक पॅकेजची (Economic Package) घोषणा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. यापूर्वी केंद्र सरकारकडून देशातील जनतेसाठी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले होते. त्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेजबाबत पाच टप्प्यात माहिती दिली होती.

आता अजित पवार यांनी सुद्धा राज्य सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करणार असल्याचे म्हटले आहे. शेती, उद्योगासह अन्य क्षेत्रासाठी या पॅकेजच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करण्यात आल्याचे ही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांकडून सुद्धा केंद्राने आर्थिक पॅकेज जाहीर केल्यानंतर राज्य सरकारने सुद्धा त्याबाबत घोषणा करावी अशी मागणी केली होती.(Doctor's Salary Increase: राज्यातील बॉण्डेड, कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला निर्णय)

दरम्यान, अजित पवार यांनी केंद्र सरकारने जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक पॅकेजवर टीका केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, केंद्राच्या पॅकेजमधून राज्याच्या हाती काय पडणार आहे. काही जणांच्या मते हे फक्त आकडे मोठे असून हातावर पोट असणाऱ्यांची मदत करण्याची खरच गरज आहे. तर राज्य सरकार स्थलांतरित मजूर आणि कामगार यांच्यासाठी त्यांना आपल्या घरी जाता यावे यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती बाबत बोलायचे झाल्यास 59546 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1982 जणांचा बळी गेला आहे. तर राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. परंतु 31 मे नंतर लॉकडाऊन संदर्भात सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.