Lockdown 3.0: रेड झोनमध्ये काही अटींच्या आधारावर दारुच्या दुकानांसह Standalone Shops सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी; कन्टेंमेंट झोनमध्ये मात्र नियम कडक

यात दारुच्या दुकानांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु, यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Twitter)

महाराष्ट्र राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. तसंच कोरोना बाधितांच्या संख्येनुसार, विषाणू फैलावाच्या वेगानुसार राज्यातील जिल्ह्यांची तीन झोनमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. या झोननुसार लॉकडाऊनच्या नियमांमध्ये मोकळीक देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार नवी नियमावली महाराष्ट्र शासनाने जारी केली होती. यात रेड झोनमधील नियमात बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र आता रेड झोनमधील दुकाने सुरु करण्यासही महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली असून यात दारुच्या दुकानांचाही समावेश करण्यात आला आहे. परंतु, यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. (तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

या अटींनुसार, रेड झोन मध्ये केवळ Standalone Shops सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली आहेत. विशेष म्हणजे यात दारुची दुकाने सुरु करण्यासही मुभा देण्यात आली आहे. तसंच एका लेनमध्ये केवळ पाच दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी या अटी लागू करण्यात आलेल्या नाहीत. परंतु, कन्टेंमेंट झोन मध्ये अद्याप कोणतीही दुकाने सुरु होणार नाहीत असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण? जाणून घ्या)

ANI Tweet: 

सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 12296 इतकी झाली असून त्यापैकी 2000 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर 9775 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 521 रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. रेड झोनमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, पुणे, सातारा, सोलापूर, अकोला, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली हे जिल्हे ग्रीन झोनमध्ये मोडत आहेत. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, बुलढाणा, अमरावती, चंद्रपूर, भंडारा आणि नंदुरबार हे सर्व ऑरेंज झोनमधील जिल्हे आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif