Maharashtra Government Formation: राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं: संजय राऊत यांच्या भाजपाला शुभेच्छा

त्यामुळे आता महायुतीमधील वाद मिटवून पुन्हा शिवसेना - भाजपा सत्तेमध्ये येणार की नवी समीकरणं पहायला मिळणार याचं उत्तर आता येणारी वेळचं देणार आहे.

Sanjay Raut | Photo Credits: Twitter

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 चा निकाल लागून 15 दिवस उलटले तरीही राज्यात अजूनही राजकीय पेच कायम आहे. राज्यपालांकडून भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण मिळाल्यानंतर आज (10 नोव्हेंबर) महायुतीतील त्यांचे मित्रपक्ष शिवसेनेकडून त्यांना सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यावेळेस शिवसेनेची आग्रही भूमिका खासदार संजय राऊत यांनी रेटून धरली आहे. भाजपाचे 105 आमदार निवडून आल्याने परंपरेनुसार सर्वाधिक आमदार असलेला पक्ष म्हणून त्यांना सत्ता स्थापनेसाठी पत्र मिळणं स्वाभाविक आहे. मात्र जर कोणी सरकार स्थापन करू शकलं नाही तर शिवसेना ती जबाबदारी घेऊ शकते असेही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महायुतीमधील वाद मिटवून पुन्हा शिवसेना - भाजपा सत्तेमध्ये येणार की नवी समीकरणं पहायला मिळणार याचं उत्तर आता येणारी वेळचं देणार आहे. महाराष्ट्रात राजकीय हालचालींचा वेग वाढला; आदित्य ठाकरे 'रिट्रीट' हॉटेलमध्ये मध्यरात्रीपासून मुक्कामी.

महाराष्ट्रात भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण मिळाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेच्या गोटातही खबदारीचा उपाय म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. आदित्य ठाकरे सह सारे आमदार सध्या मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये असून आज दुपारी शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेट होऊ शकते असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet 

Shiv Sena leader Sanjay Raut: Congress is not the enemy of the State. All parties have differences on some issues. https://t.co/ckIfQzI4TP

भाजपा सत्ता स्थापन करू शकते का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले आमच्या भाजपाला शुभेच्छा आहेत. ज्या अर्थी ते आमचाच मुख्यमंत्री येणार, भाजपाची सत्ता येणार असं म्हणत आहेत त्या अर्थी त्यांच्याकडे संख्याबळ असावं. त्यामुळे त्यांनी नक्कीच सत्ता स्थापन करून दाखवावं असं आव्हानदेखील त्यांनी दिलं आहे. दरम्यान आजही सामना या शिवसेनेच्या मुखपत्रकातून शिवसेनेने  भाजपावर, भाजपाच्या नेतृत्त्वावर टीका केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif