Lockdown in Maharashtra: राज्यात 28 फेब्रुवारी पर्यंत लॉकडाऊन कायम
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील मार्च महिन्यापासून घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अजून महिन्याभराची वाढ करण्यात आली आहे. राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील मार्च (March 2020) महिन्यापासून घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अजून महिन्याभराची वाढ करण्यात आली आहे. राज्यात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) कायम राहणार आहे. दरम्यान, मिशन बिगेन अगेन (Mission Begin Again) अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. त्याचप्रमाणे यापूर्वी लागू करण्यात आलेले नियम 28 फेब्रुवारी पर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. (कोरोना व्हायरसबाबत केंद्राने जारी केल्या नवीन मार्गदर्शक सूचना; चित्रपटगृहे व थिएटर अधिक क्षमतेसह सुरु, जलतरण तलाव सर्वांसाठी खुला)
मार्च ते मे 2020 या काळात कडक लॉकडाऊन जारी होता. जूनपासून अनलॉक प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक महिन्यात बंद असलेल्या सुविधा टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्या. त्यामुळे जनजीवन बहुतांश प्रमाणात पूर्वपदावर आले आहे. विशेष म्हणजे मुंबई लोकलही सर्वसामान्यांसाठी 1 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यान, मास्क घालणे, सोशल डिस्टसिंगचे पाळणे, हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. (Mumbai Local Updates: आजपासून मुंबईच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर धावणार अतिरिक्त लोकल ट्रेन्स)
ANI Tweet:
गुरुवारच्या अपडेटनुसार, राज्यात 2,889 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 3,181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 19,23,187 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 43,048 सक्रीय रुग्ण असून रिकव्हरी रेट 95.28% इतका आहे. विशेष म्हणजे लसीकरणाला सुरुवात झाली असून 25 जानेवारीपर्यंत राज्यात 35 हजार 816 (74 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)