Maharashtra: पालघर मधील गावात पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून पोहचवण्यात आली कोरोनावरील लस
देशातील विविध ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशातच महाराष्ट्रातील पालघर येथे पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून कोरोनावरील लस पोहचवण्यात आली.
Maharashtra: देशात कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवली जात आहे. देशातील विविध ठिकाणी लसीकरणासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अशातच महाराष्ट्रातील पालघर येथे पहिल्यांदाच ड्रोनच्या माध्यमातून कोरोनावरील लस पोहचवण्यात आली. या अभियानाची सुरुवात अॅडिशनल चीफ सेक्रेटरी (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडून करण्यात आली. खासकरुन जाट गावात पोहचवण्यासाठी तासाभराचा वेळ लागत होता. परंतु ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या 9.5 मिनिटात लस पोहचवण्यात आली.(नवी मुंबईत शाळा सुरु होताच 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण)
आरोग्य विभागाचे डिप्युटी डायकेर्टर (कोकण) डॉ. गौरी राठोड यांनी असे म्हटले की, पालघरची भौगोलिक स्थिती किंवा रस्त्यांच्या मार्गाने लस पोहचवणे कठीण होते. परंतु ड्रोनच्या माध्यमातून अवघ्या 10 मिनिटात ती पोहचवण्यात आली. सध्या हा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला आहे. यापुढे सुद्धा अन्य परिसरात ही सुविधा लागू केली जाऊ शकते. हे ड्रोन 15-20 किमी पर्यंत जाऊ शकतात. याच्या माध्यमातून 5 किलो किंवा त्यापेक्षा अधिक वजनाचे सामान पाठवले जाऊ शकते.(BMC Warns To People: मुंबईतील नागरिकांना सणासुदीच्या आठवड्यापूर्वी बीएमसीचा इशारा, नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करणार)
दरम्यान, हे ड्रोन मुंबईत राहणारा धवल घेलाशा म्हणून उडवतो. त्यांचे असे म्हणणे आहे की, आमचा बेस स्टेशन जवाहार आहे. या प्रोजेक्टची पायलट फ्लाइट जाट गावापर्यंत होती. खासकरुन 1 तास लागतात. परंतु ड्रोनच्या माध्यमातून 9.5 मिनिटात लसीचे 300 डोस जाट गावात पोहचवले गेले.