महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मोहम्मद सिरज शेख बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत
ही घटना मुंबई येथील गोवंडी परिसरात घडली आहे.
एका 13 वर्षीय मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांकडून भाजपचे माजी आमदार सिराज शेख यांच्यावर पोस्को अंतर्गत अटक करण्यात आली आहे. ही घटना मुंबई येथील गोवंडी परिसरात घडली आहे. पीडित मुलीला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरण्यास मदत करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून सिराज यांनी बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. या निवडणुकीत सिराज हे अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. परंतु, बलात्काराचा आरोप साफ खोटा असून विरोधकांकडून रचलेले कट आहे, असे सिराज यांच्या समर्थकांचे मत आहे.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये मानखूर्द शिवाजी नगर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, सिराज यांच्यावर मानखूर्द भागातील 13 वर्षीय मुलीला घरी बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिराज यांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास मदत करण्याच्या बहाणाने पीडितला घरी बोलावले होते. पीडित घरी आल्यानतंर सिराज यांनी पीडित मुलगी त्यांना आवडत असल्याचे सांगितले. परंतु, पीडितने नकार दिल्यानंतर सिराज यांनी तिच्यावर बलात्कार केला अशी तक्रार गोवंडी पोलिसात दाखल केली आहे. परंतु, सिराज यांच्या समर्थकांनी याला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. हा विरोधी पक्षाने सिराज यांच्या विरोधात रचलेला कट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. हे देखील वाचा- मुंबई: जोगेश्वरी येथे डॉक्टरकडून रुग्णावरच बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक
पॉस्को कायद्यामुळे एखाद्याला जामीन मिळणे कठीण होते. पोस्को कायद्यातील काही कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ज्यात 16 वर्षाखालील मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल 10 ते 20 वर्षांपर्यंत शिक्षा केली जाते. अधिकाऱ्यापदावर असलेल्या एखाद्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्यास त्याला मृत्यूदंड ठोठावला जाणार.