NCP vs NCP in Baramati: सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार देणार तगडा उमेदवार, अनुभव नसला तरी दिग्गजांचा पाठींबा

आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP vs NCP) म्हणजेच अजित पवार (Ajit Pawar) गट विरोधात सुप्रिया सुळे गट पर्यायाने शरद पवार (Sharad Pawar) गट असा सामना होण्याची चिन्हे आहेत.

Supriya Sule And Sunetra Pawar | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Supriya Sule Vs Sunetra Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP vs NCP) म्हणजेच अजित पवार (Ajit Pawar) गट विरोधात सुप्रिया सुळे गट पर्यायाने शरद पवार (Sharad Pawar) गट असा सामना होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथून बोलताना तसे संकेत दिले. त्यामुळे आगामी निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) असा सामना रंगण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत शरद पवार आणि त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या ताब्यात ऐतिहासिकदृष्ट्या राहिला आहे. मात्र, अजित पवार यांची घोषणा परिवारात होणाऱ्या संभाव्य राजकीय लढतीचे संकेत देते.

'उत्साह ईव्हीएममध्ये दिसून येऊ द्या'

अजित पवार म्हणतात, "महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून आणि निवडणुका सुरू झाल्यापासून, बारामतीत असे कधीच घडले नाही की सर्वोच्च उमेदवाराच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. पण तसे करणारा मी आहे त्याचा मला अभिमान आहे. आगामी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मी येथून कोणीही उमेदवार उभा केला तरी तुम्ही त्याला विजयी करा. तो विजयी झाला तरच मी येथून विधानसभा निवडणूक लढेन. तरच मी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत इथूनच लढेन. तुमचा माझ्याबद्दलचा उत्साह ईव्हीएममध्ये दिसून येऊ द्या. येणाऱ्या काळात लोक तुमच्याकडे येतील आणि भावनिक मुद्द्यांवर तुमची मते मागतील. पण तुम्ही भावनिक मुद्द्यांवर मत द्यायचे की विकासाचे काम सुरू ठेवायचे आणि तुमच्या भावी पिढीच्या कल्याणासाठी हे तुम्हीच ठरवायचे आहे. (हेही वाचा, NCP MLA Disqualification Verdict: शरद पवारांना मोठा धक्का! अजित पवार गटच 'खरा' राष्ट्रवादी काँग्रेस; राहुल नार्वेकर यांची घोषणा)

सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबद्दल संकेत

बारामती लोकसभा मतदारसंघातून या वेळी यापूर्वी कोणतीही निवडणूक न लढवलेल्या उमेदवाराला उमेदवारी देणार. मात्र त्या व्यक्तीला पुरेसा अनुभव असलेल्या अनेकांचा पाठिंबा असेल, असे असे सांगत अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबद्दल संकेत दिले. बारमती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्य प्रथमच पवार विरुद्ध पवार (सुप्रिया सुळे) असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अर्थात लोकसभा निवडणूक अद्याप जाहीर झाली नाही. जोपर्यंत निवडणूक जाहीर होत नाही तोपर्यंत सर्व अंदाजच लावले जात आहे. राजकारणात काहीही घडू शकते. त्यामुळे बारमतीतून नेमके कोण मैदानात उतरते याबातब उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच कळणार आहे. (हेही वाचा, Supriya Sule Vs Sunetra Pawar: बारामतीमध्ये होणार नणंद-भावजय लढत? अजित पवार यांच्याकडून पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेसाठी उमेदवारीची शक्यता)

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. ज्यावर शरद पवार गट आणि शिवसेना (UBT) पक्षाकडून जोरदार टीका सुरु आहे. नार्वेकर यांचा निर्णय अत्यंत अतार्कीक आणि असंवैधानिक असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे.