'India's Got Latent' विरूद्ध Maharashtra Cyber Cell कडून गुन्हा दाखल; सहभागी सार्यांना मिळणार कायदेशीर नोटीस
सध्या शो मधील सार्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यामुळे सुमारे 30-40 जणांना कायदेशीर बाबीचा भाग म्हणून चौकशीला सादर व्हावे लागेल.
Maharashtra Cyber Police कडून India’s Got Latent च्या वाढत्या वादामधून आता FIR दाखल करण्यात आली आहे. यामध्ये कॉमेडियन Samay Raina, शो प्रोड्युसर Balraj Ghai सह अन्य सार्य कलाकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये शोच्या पहिल्या एपिसोड पासून सहाव्या एपिसोड पर्यंत सार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, प्रशासनाने शो चा कंटेंट पाहून त्यावर कारवाई केली आहे. आय टी अॅक्टच्या सेक्शन 67 नुसार कारवाई होणार आहे. सोबतच Bharatiya Nyaya Sanhita च्या विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.
ANI च्या ट्वीट मधील माहितीनुसार, सध्या शो मधील सार्यांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यांना कायदेशीर बाबीचा भाग म्हणून चौकशीला सादर व्हावे लागेल. असे महाराष्ट्र सायबर सेलने म्हटलं आहे. शो मधील चं एक आक्षेपार्ह विधान वायरल झाल्यानंतर या शो विरूद्ध अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. नक्की वाचा: Indias Got Latent Controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'वर बंदी येणार का? ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने पत्र लिहून गृहमंत्री अमित शहा यांना केली विनंती .
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी यूट्यूबला पत्र लिहून 'इंडियाज गॉट लेटेंट'चे सर्व भाग हटवण्याची विनंती केली आहे. दरम्यान केंद्राने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला निर्देश दिल्यानंतर वादग्रस्त क्लिप आधीच YouTube वरून काढून टाकण्यात आली आहे.
Ranveer Allahabadia ने त्याच्या आक्षेपार्ह विधानाची क्लिप वायरल झाल्यानंतर नेटकर्यांचा संताप पाहून तातडीने माफी मागितली आहे. मात्र पोलिसांनी त्यांची कारवाई सुरूच ठेवली आहे. रणवीरने कोणत्याही गोष्टीचे स्पष्टीकरण न देता आपल्याकडून झालेलं विधान समर्थनीय नसल्याचं म्हणत माफी मागितली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)