Maharashtra Curfew Guidelines: राज्यात 1 मे पर्यंत लागू असलेल्या संचारबंदी मध्ये पहा नेमकं काय सुरू, काय बंद असेल?

महाराष्ट्रात आज रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू होत असल्याने विनाकारण बाहेर पडण्यावर सरकारने पूर्णपणे बंदी घातलेली आहे.

Curfew | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Break The Chain Fresh Guidelines: दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये उच्चांकी कोरोना रूग्ण वाढ होत असताना आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या प्रशासनाने कोरोना विरूद्धची लढाई अधिक जोमाने लढण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा अशी नागरिकांना साद घालत राज्यात निर्बंध कडक केले आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत आता राज्यात आज (14 एप्रिल) दिवशी रात्री 8 वाजल्यापासून कलम 144 लागू करत संचारबंदी (Curfew) जाहीर केलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणालाही विनाकारण बाहेर पडण्यास बंदी आहे. मग या नव्या गाईडलाईन नुसार आता महाराष्ट्रातील जनतेला कोणते नियम पाळावे लागणार विवाह सोहळा, अंत्यविधी यांच्यासोबत किराणा माल खरेदी, भाजी खरेदी यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी सुरू राहणार आहेत? आणि कोणत्या गोष्टींवर बंदी असेल? हे पहा आणि त्यानुसार पुढील 15 दिवसांसाठी सज्ज व्हा. मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांच्याकडून आर्थिक दुर्बल घटकांसाठी 5 हजार 476 कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज जाहीर.

महाराष्ट्रात काल रात्री उच्चांकी कोरोनारूग्ण संख्या नोंदवण्यात आली आहे. मागील 24 तासांत 60 हजाराहून अधिक कोरोनाबाधित राज्यात आढळले आहेत. सध्या कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरण वेगवान केले जात आहे. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसीवीरची अपुरी संख्या यामुळे आरोग्ययंत्रणेवरही कमालीचा ताण आहे.

महाराष्ट्रात 1 मे पर्यंतच्या कर्फ्यू काळात काय बंद असेल काय सुरू असेल?

दरम्यान ज्या व्यक्तींना बाहेर पडण्याची मुभा आहे त्यांना मास्कचा चेहर्‍यावर योग्यप्रकारे वापर करणं बंधनकारक आहे. तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करणं, हात वारंवार नीट धुणं आवश्यक आहे.