महाराष्ट्र: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण Yashomati Thakur यांच्या अंगलट, सुनावली तीन महिन्यांची शिक्षा
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्रीपदावर असलेल्या यशोमती ठाकूर यांच्याबद्दल सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यानुसार महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना कोर्टाकडून तीन महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर यशोमती ठाकूर यांच्या एका जुन्या प्रकरणावर सुनावणी होत कोर्टाने त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यशोमती ठाकूर यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे हे प्रकरण आहे. त्यामुळेच अमरावती कोर्टाने यशोमती ठाकूर यांना शिक्षेसह 15 हजारांचा दंड सुद्धा सुनावला आहे. मात्र या गोष्टीनंतर विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
याप्रकरणी महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या बाजूने प्रतिक्रिया देत असे म्हटले आहे की, एका जुन्या प्रकरणी सुनावणी केली गेली आहे. त्यानंतर भाजपकडून यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यांना देशाच्या न्याय प्रक्रियेवर विश्वास नाही आहे. अतुल लोंढे यांनी या प्रकरणी यशोमती ठाकूर हायकोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्य मुद्द्यांवरुन लक्ष हटवण्यासाठीच भाजप कडून अशा पद्धतीचे भाष्य केले जात आहे. मात्र राज्यातील जनतेला सर्व काही माहिती आहे. त्यामुळे भाजप त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करु शकत नाही.(वेब मीडिया असोसिएशन मुंबई कायदेशीर सल्लागार पदी Criminologist स्नेहील ढाल यांची निवड)
दरम्यान, यशोमती ठाकूर यांना राज्यातील सर्वश्रेष्ठ नेत्यांपैकी एक मानले जाते. यशोमती ठाकूर नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहतात. तर अमरावती मधील तिवसा जागेवरुन त्या काँग्रेसच्या आमदार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्रीपदाची धुरा सुद्धा सांभाळत आहेत. यशोमती ठाकूर विदर्भातील आहेत पण तिसऱ्यांदा आमदार बनल्या आहेत. या व्यतिरिक्त यशोमती ठाकूर काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव सुद्धा आहेत. तसेच पेशाने त्या वकील ही आहेत.