Maharashtra: राज्यामध्ये महाविद्यालय, युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सुरु करण्यासंदर्भात अद्याप निर्णय नाही- उदय सामंत

Uday Samant | (Photo Credits: Twitter)

राज्यात अद्याप कोरोना व्हायरसचे थैमान कायम आहे. परंतु रुग्णांचा वेग मंदावला गेला आहे. याच पार्श्वभुमीवर राज्यात अद्याप शाळा आणि महाविद्यालयांसह युनिव्हर्सिटी अद्याप सुरु करण्यात आलेल्या नाहीत. पण युसीजीकडून विद्यापीठ आणि महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. मात्र राज्यात महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्याबद्दल अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही असे राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.(मुंबई: UPSC CDS 2020-21 ची 8 नोव्हेंबरला परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवासाची मुभा; तिकीटासोबत अ‍ॅडमीट कार्ड सोबत असणं आवश्यक)

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सद्यच्या घडीला महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी दिवाळीनंतर निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुंसोबत चर्चा केल्यानंतर स्पष्ट केले जाणार असल्याचे ही उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर 13 विद्यापीठ वगळून अन्य सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडल्या आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाची परीक्षा सुद्धा घेण्यात आली. मात्र अद्याप ज्या परीक्षा राहिल्या आहेत त्यांच्या दिवाळीनंतर घेतल्या जाणार असल्याचे ही उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. त्याचसोबत नापास विद्यार्थ्यांच्या ही परीक्षा घेण्यात येणार आहेत.(Diwali Vacation 2020 For Schools: महाराष्ट्रात यंदा शाळांना 12-16 नोव्हेंबर दिवाळीची सुट्टी; ऑनलाईन वर्ग बंद राहणार)

दरम्यान, युसीजीने राज्यात विद्यापीठ आणि महाविद्यालये कोरोनाच्या अटी आणि नियमांचे पालन करत सुरु करण्यात यावेत असे म्हटले आहे. परंतु राज्यात महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसह सर्व कुलगुरुंची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांना महाविद्याल आणि विद्यापीठ पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.