महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सारीच प्रार्थनास्थळं बंद आहेत. अशावेळी आगामी सणासुदीचा काळ पाहून मंदिरं खुली करा अशा मागणीसाठी आज राज्यात महाराष्ट्र भाजप आंदोलन करत असताना दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (BS Koshyari) यांनी देखील आपली नाराजी बोलून दाखवली आहे. दरम्यान या वरून दोघांमध्येही पत्रव्यवहार झाला आहे. राज्यपालांनी बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का आहेत? हिंदुत्त्वाचा विसर पडला का? मंदिरं सुरु करु नयेत असे दैवी संकेत मिळतात का? अशाप्रकारचे प्रश्न पत्रामध्ये विचारले आहेत. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी देखील तातडीने प्रत्युत्तर देताना मुंबईला पीओके म्हणणाऱ्याचं हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही. केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का?
मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . असं सांगत राज्यात धार्मिक स्थळं, प्रार्थनास्थळं उघडण्याबाबत विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी.
राज्यपालाचं पत्र
Maharashtra Governor wrote to CM Uddhav Thackeray, seeking re-opening of places of worship with COVID precautions
"I wonder if you're receiving any divine premonition to keep postponing re-opening or you've suddenly turned 'secular' yourselves, the term you hated?" letter states pic.twitter.com/BedTgTSP2d
— ANI (@ANI) October 13, 2020
उद्धव ठाकरे यांचे प्रत्युत्तर
माननीय राज्यपालमहोदय ,महाराष्ट्र राज्य यांसी - जय महाराष्ट्र ,
महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी ‘ हि मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सुचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही.माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो.
दरम्यान महाराष्ट्रात आज भाजप पक्षाकडून विविध ठिकाणी आंदोलनं सयरू आहेत. यामध्ये विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचा सहभाग आहे. तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रवेश मिळावा म्हणून आज भाजपा कार्यकर्ते आक्रमक देखील झाले. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच रोखून ठेवले आहे.