Maharashtra Cabinet Expansion 2019: आज बहुप्रतिक्षित महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता पार पडणार शपतविधी

राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युतीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर आज (16 जून) बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा होणार असून सकाळी 11 वाजता मंत्री आपल्या पदाची शपथ घेणार आहेत.

Uddhav Thackeray and Devendra Fadnavis (Photo Credits-Facebook)

Maharashtra Cabinet Expansion 2019:  राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) युतीने लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) दणदणीत विजय मिळाला. त्यानंतर आज (16 जून) बहुप्रतिक्षित अशा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा होणार असून सकाळी 11 वाजता मंत्री आपल्या पदाची शपथ घेणार आहेत. तर राजभवनात आज हा नव्या मंत्र्यांचा शपतविधी पार पडणार आहे. काल (16 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारिख सांगितली. त्यामुळे आता सर्व जनतेचे लक्ष मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागते याकडे लागले आहे.

नव्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सोमवार पासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी नव्या लोकांना मंत्रिमंडळात संधी देताना, भाजपाकडून 5 ते 6 तर शिवसेनेकडून दोन मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रिपदाचा समावेश असेल. यात राधा कृष्ण विखे पाटील आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची जागा निश्चित असल्याचे समजते. तसेच रिपाई म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) तर्फे मंत्रिमंडळात एक नाव निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपाई पक्षाचे सचिव अविनाश महातेकर (Avinash Mahatekar) यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या चर्चांची पुष्टी करत स्वतः रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी ही माहिती दिली आहे.

(मंत्रिमंडळाचा विस्तार, सकाळी 11 वाजता शपतविधी; जाणून घ्या कोणाचा होऊ शकतो समावेश तर कोणाला मिळेल डच्चू)

या लोकांचा होऊ शकतो समावेश –

>औरंगाबाद पूर्व मतदार संघाचे भाजप आमदार अतुल सावे

>मोर्शी भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे

>रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर

>अनिल बोंडे व संजय कुटे यांच्यापैकी एक, तर शिवाजीराव नाईक व अतुल सावे यांच्यापैकी एक

या लोकांना मिळू शकतो डच्चू -

राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गडचिरोली पालकमंत्री अंबरीश आत्राम

काही दिवसांपूर्वी वित्त व व्यवस्थपन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मंत्रिमंडळातील विस्ताराबाबत माहिती दिली होती. गृहमंत्री व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या सांगण्यानुसार मुख्यमंत्री पदासाठी भाजपाचा उमेदवार तर कॅबिनेट मंत्रिपदांसाठी मित्रपक्षाचे सदस्य अशी वर्गवारी निश्चित करण्यात आली होती

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement