Maharashtra Budget session 2020: शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिका कर्जमाफीच्या माध्यमातून सुरु: देवेंद्र फडणवीस
दररोज कुठे ना कुठे जळीतकांड घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे हे सरकार महिला आणि राज्यांतील विविध मुद्द्यांवर संवेदनशील नाही. म्हणूनच आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Maharashtra Budget session 2020: विद्यमान राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी (Farmers Debt Waiver) करण्याचे अश्वासन दिले आहे पण ते पूर्ण होताना दिसत नाही. या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीच नव्हे तर कर्जमुक्ती करु, सातबारा कोरा करु असे म्हटले होते. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचेही अश्वासन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिले होते. परंतू, त्यातील एकही अश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही. कर्जमाफीच्या माध्यमातून केवळ शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मालिकाच राज्य सरकारने सुरु केल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांनी केली आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेन आजपासून (24 फेब्रुवारी 2020) सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून, त्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरु केले होते. या आंदोलनावेळी देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
विद्यमान सरकार हे नुसते अश्वासने देत आहे. दिलेल्या अश्वासनांची पूर्तता मात्र करत नाही. शेतकऱ्यांनाक सरसकट कर्जमाफी देऊ असेही या सरकारने सांगितले होते. परंतू, आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कर्जमाफी शेतकऱ्यांना मळाली नाही. त्यामुळे या सरकारच्या निषेधार्थ आम्ही आंदोनल करत आहोत. कर्जमाफीच्या अश्वासनावरुन आम्ही सरकारला जाब विचारु. सरकारने दिलेले एकही अश्वासन आतापर्यंत पूर्ण केले, नसल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. (हेही वाचा, Maharashtra Budget Session 2020: महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून होणार सुरू; 6 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प)
दरम्यान, राज्यात महिला सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर बनला आहे. दररोज कुठे ना कुठे जळीतकांड घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे हे सरकार महिला आणि राज्यांतील विविध मुद्द्यांवर संवेदनशील नाही. म्हणूनच आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.