Maharashtra Budget 2023: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज होणार सादर, रोजगार, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांस कोणाला मिळणार काय? जोरदार उत्सुकता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच अर्थ खात्याचा कारभार असल्याने अर्थमंत्री या नात्याने ते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राज्य विधिमंडळाच्या पटलावर ठेवतील.

Maharashtra Legislature | (File Photo)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) भाजप युती सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) आज विधिमंडळात सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेच अर्थ खात्याचा कारभार असल्याने अर्थमंत्री या नात्याने ते महाराष्ट्राचा अर्थसंकल्प राज्य विधिमंडळाच्या पटलावर ठेवतील. राज्यात वाढती महागाई, बेरोजगारी आणि अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान यांवरुन विरोधकांनी जोरदार आवाज उठवला आहे. शिवाय शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषयही अत्यंत महतत्वाचा आहे. त्यामुळे या सर्वांवर राज्य सरकार काय निर्णय घेते. कोणाला काय फायदा देते याबाब उत्सुकता आहे.

राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ अर्थसंकल्पच नव्हे तर तो महाराष्ट्राचा महाअर्थसंकल्प असणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच म्हटले आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात फडणवीसांच्या पोतडीतून काय निघणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये नेमके कोणते मुद्दे आणि कशावर भर असावा. कोणत्या गोष्टींचा त्यात समावेश असावा यावर विचारविनिमय करण्यासाठी सर्व मंत्री, सचिव, उद्योग संघटनांसोबत फडणवीस यांनी नुकतीच चर्चा केली होती. अवकाळी पावसामुळे झालले शेतीचे नुकसान आण शेतकऱ्यांच्या डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा हे आजघडीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. सोबतच, शेतमालाचे कोसळलेले भावी राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यातून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार काय उपाययोजना अथवा तरतूद आजच्या अर्थसंकल्पात करते याबाबतही उत्सुकता आहे.

राज्यात सत्तेवर आलेल्या सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. जनमानसातही या सरकारविरोधात आणि सरकारच्या बाजूने संमिश्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारला जनभावना, राज्याची आर्थिक स्थिती आणि कर्ज यांचा समतोल राखत कामगिरी करावी लागणार आहे. विविध योजना, घोषणा यांवर केवळ हवाबाजी न करता वास्तव स्थितीही जाणून घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, राज्य सरकारने विधिमंडळात बुधवारी आपला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यानुसार राज्यात सन 2022-23 मध्ये विकासदरात 6.8% इतकी वाढ होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतही 7.00% वाढ अपेक्षीत आहे.