नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.
Maharashtra Budget 2021-22 Live: नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार- अजित पवार
महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज सादर केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा व अर्थ राज्यमंत्री शंबूराद देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज सादर केला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा व अर्थ राज्यमंत्री शंबूराद देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प असणार असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांनी गेल्या वर्षात 9500 रुपयांच्या तोट्याचे बजेट सादर केले होते. अर्थमंत्र्यांच्या समोर कोरोना व्हायरसचे संकट, कर्जाचा बोझा, सरकारी खजिन्यात कमी असे विविध मुद्दे त्यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे.
अजित पवार यांनी रविवारी असे म्हटले की, यंदाच्या वर्षात महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात एक लाख करोड रुपयांनी कमी असू शकते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे ही म्हटले की, केंद्र सरकारला 'एक राष्ट्र, एक कर' कार्यक्रमाअंतर्गत या वर्षासाठी महाराष्ट्रासाठी 25 हजार कोटी रुपये देणे अद्याप शिल्लक आहे. परंतु आता पैसे पाठवणे सुरु झाले आहे. परंतु अशा पद्धतीची कमतरता ही भविष्यात होणाऱ्या विकासकार्यांवर प्रभाव टाकू शकते. त्याचसोबत वाढत्या पेट्रोल-डिझेल संदर्भातील कर कमी करण्याबद्दल काही निर्णय सरकार घेणार का याकडे सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टमध्ये विकास दरात 8 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे. असा अंदाज लावला जात आहे की, यंदाचा अर्थसंकल्प हा गाव, गरीब, शेतकरी, महिला आणि तरुणांसदर्भातील असू शकतो. त्याचसोबत या वर्षात महापालिकेच्या निवडणूका सुद्धा पार पडणार आहेत. त्यामुळे हा अर्थसंकल्प हा फार महत्वाचा ठरणार आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा राज्यात वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील कोणत्या नव्या योजनांमध्ये कपात केली जाणार हे सुद्धा पहाणे महत्वाचे ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)