Maharashtra Board 10th Result 2019 Date: महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल जाहीर; आता SSC चा रिझल्ट लवकरच
राज्यात तब्बल 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 4 हजार 874परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली.
महाराष्ट्र बोर्डाचा आज बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आता दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. अपेक्षेप्रमाणे 12 वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागल्याने दहावीचा निकालही जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 10 जून पर्यंत दहावीचा निकाल लागेल. महाराष्ट्र बोर्ड 12 वीचा निकाल mahresult.nic.in वर घोषित; SMS आणि Online असा पहाल निकाल
1 मार्च ते 22 मार्च 2019 या काळात यंदा दहावीची परीक्षा पार पडली आहे. राज्यात तब्बल 17 लाख 813 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. ही परीक्षा 4 हजार 874परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. जुन्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या परीक्षेला बसलेल्यांना ही परीक्षा म्हणजे शेवटची संधी होती. तर, नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची या अभ्यासक्रमानुसार घेतली जाणारी ही पहिलीच परीक्षा असल्याने अधिकाधिक मुलांचा सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू
यंदा आरक्षणाचा कोटादेखील वाढल्याने शिक्षण मंत्रालयाकडून इन हाऊस कोट्यातून प्रवेश देण्याचं प्रमाण 10% करण्यात आलं होतं. यामुळे खुल्या गटातूनही अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया खुली होणार आहे. परीक्षेच्या काळात याबाबत चर्चा रंगल्याने अनेक विद्यार्थी तणावात होते मात्र विनोद तावडे यांनी अकरावी प्रवेशप्रकिया सुकर केली जाईल, सध्या परीक्षांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला होता.