Maharashtra Board Exams 2023: दहावी, बारावी बोर्ड परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आता मोबाईल अ‍ॅप कॅमेर्‍याची असणार नजर

यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरही वेळेत न पोहचल्यास पेपर देता येणार नाही.

Representational Image (Photo Credits: unsplash.com)

कोरोना संकटानंतर यंदा पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधांविना दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा पार पडणार आहेत. यंदा बारावीची बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी पासून तर दहावीची बोर्ड परीक्षा 2 मार्च पासून सुरू होणार आहे. दरम्यान बोर्डा परीक्षांमध्ये कॉपी चे प्रकार रोखण्यासाठी बोर्डाकडून विशेष काळजी घेतली जाते. यंदा कॉपी बहाद्दरांना रोखण्यासाठी पर्यवक्षकांसोबतच विद्यार्थ्यांवर मोबाईल अ‍ॅप्स कॅमेराची नजर असणार आहे. परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांकडील मोबाइल ॲपवरील कॅमेऱ्यातून वर्गावर नजर ठेवली जाणार आहे.

महाराष्ट्रात अनेक परीक्षा केंद्रांवर सरेआम कॉपी पुरवली जाते. परीक्षेचा पेपर फुटतो. पण आता कॉपी करून परीक्षा देण्याच्या प्रकाराला बोर्डाकडून खास तंत्रज्ञानाची मदत घेत रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दरम्यान यामुळे प्रामाणिकपणे पेपर लिहणार्‍या आणि हुशार मुलांवरील अन्याय कमी करण्यासाठी बोर्ड पहिल्यांदाचा कॅमेर्‍याची मदत घेत आहे. सोबतच काही ठिकाणी पर्यवेक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संगनमताने कॉपीचे प्रकार होत होते ते देखील यामुळे रोखले जाणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra Board SSC HSC Exam 2023: यंदा 10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर न पोहचल्यास मुकावं लागू शकेल पेपर ला; नियमांत बदल .

दरम्यान यंदाच्या वर्षी विद्यार्थी पुन्हा लेखी स्वरूपात संपूर्ण अभ्यासक्रमावर आणि वाढीव वेळेशिवाय परीक्षेला सामोरं जाणार आहेत. यंदा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरही वेळेत न पोहचल्यास पेपर देता येणार नाही.