Maharashtra Board 12th Result 2021: बारावीचा निकाल जाहीर; msbshse.co.in वर ऑनलाईन निकाल असा पहा स्टेप बाय स्टेप!
महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स msbshse.co.in सोबतच काही थर्ड पार्टी साईट्स देखील विद्यार्थ्यांसाठी निकाल पाहण्यासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
MSBSHSE 12th Result 2021: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज बारावीचा निकाल (Maharashtra Board HSC Result) जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा बारावीचा निकाल 99.63% लागला आहे. या निकालानंतर विद्यार्थ्यांना विषय निहाय त्यांचे मार्क्स पाहण्यासाठी दुपारी 4 वाजल्यापासून ऑनलाईक निकालाच्या लिंक्स जारी करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स msbshse.co.in सोबतच काही थर्ड पार्टी साईट्स देखील विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता यंदा अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जारी करण्यात आलेला बारावीचा निकाल तुम्ही पाहू शकता. यावेळी 10वी, 11वीचे मार्क्स प्रत्येकी 30% आणि 12वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स 40% या फॉर्म्युल्याने बारावीचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. नक्की वाचा: Maharashtra HSC Result 2021: आज बारावीचा निकाल पाहण्यासाठी तुमचा Class 12 Roll Number हा mh-hsc.ac.in वर कसा पहाल?
यंदा नियमित विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल 99.45%,कला शाखेचा निकाल 99.83%, वाणिज्य शाखेचा निकाल 99.91% व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा निकाल 98.80% लागला आहे. तर 6542 कॉलेजचा निकाल 100% लागला आहे. मग तुमचा निकाल पाहण्याची उत्सुकता असेल तर तो कसा पहाल हे स्टेप बाय स्टेप इथे पाह.
महाराष्ट्र 12वी निकाल ऑनलाईन कसा पहाल?
- अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- 'HSC results 2021’ चं नवं पेज ओपन होईल.
- नव्या विंडो वर तुम्हांला विचारलेली माहिती भरा. यामध्ये रोल नंबर आणि आईचं नाव विचारलं जाईल.
- आता तुम्हांला निकाल विषय निहाय पाहता येईल.
- हा निकाल सेव्ह करून ठेवा.
12वी निकाल 2021 च्या वेबसाईट्स
आज जाहीर झालेला बारावीचा निकाल https://hscresult.11thadmission.org.in, https://msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in, https://lokmat.news18.com, www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर पाहता येईल.
बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, 1319754 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र होते, त्यापैकी 1314965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.