भाजपा - शिवसेना युती वर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य; लवकरच युतीची घोषणा होईल, विधानसभेत 220 जागा जिंकण्याचा व्यक्त केला मानस
मात्र अद्याप सध्या सत्ते असलेली भाजप - शिवसेना युती यांच्यामध्ये आगामी निवडणूकांसाठी जागावाटपावरून वाद सुरू आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 आता अवघ्या महिन्याभरापेक्षा कमी दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र अद्याप सध्या सत्ते असलेली भाजप - शिवसेना युती यांच्यामध्ये आगामी निवडणूकांसाठी जागावाटपावरून वाद सुरू आहेत. आज (24 सप्टेंबर) महाराष्ट्र भाजपा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी भाजपा- शिवसेना युतीच्या चर्चा आणि जागावाटप शेवटच्या टप्प्यात आलं आहे. लवकरच त्याची जाहीर घोषणा होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली आहे. तसेच ज्यांना युती होऊ नये असं वाटत आहे त्यांची निराशा होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सोबतच विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाच्या पारड्यात 220 जागा पडतील असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला आहे.
काही वेळापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी युतीमध्ये 288 जागांचं वाटप हे भारत-पाक विभाजनापेक्षाअ भयंकर असल्याचं म्हटलं होतं. तर काही दिवसांपूर्वी दिवाकर रावते यांनी सेना- भाजपाने युतीत 50-50 चा फॉर्म्युला न पाळल्यास युती तोडण्याची भाषा केली होती. मात्र आता युतीमध्ये नेमकी कशी चर्चा होते आणि कोणत्या फॉर्म्त्युल्यावर एकमत होते हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. सध्या देशात भाजपाचं वर्चस्व असल्याने महाराष्ट्रातही शिवसेना छोट्या भावाची भूमिका स्वीकरत भाजपं दईल ती ऑफर स्वीकारणार का? अशी चर्चा रंगायला आता सुरूवात झाली आहे.
ANI Tweet
महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी निवडणूक मतदान एका टप्प्यात पार पडणार आहे. सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने 50-50 फ़ोर्म्युल्यासह जागावाटय करत प्रचाराला सुरूवात केली आहे. तर बहुजन वंचित आघाडीपासून वेगळं होत एमआयएमनेदेखील स्वबळावर आगामी निवडणूकांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे.अद्याप महाराष्ट् नवनिर्मण सेना या पक्षाने भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र तेदेखील काही निवडक जागांवर निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं जात आहे.