Maharashtra Assembly Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन 17 जुलै पासून 4 ऑगस्ट पर्यंत

अजित पवारांच्या बंडानंतर हे पहिलंच अधिवेशन आहे.

Maharashtra Legislative Assembly | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर सत्तेसाठी अनेक गणितं बदलल्याचं मागील काही दिवसांमध्ये दिसलं आहे. आता अशा वातावरणामध्ये महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची पावसाळी अधिवेशनाची (Maharashtra Assembly Monsoon Session) तारीख जाहीर झाली आहे. 17 जुलै पासून हे अधिवेशन सुरू होणार असून पुढील 15 दिवस चालणार आहे. त्यामुळे 17 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान हे अधिवेशन चालणार आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींचे पडसाद विधिमंडळामध्ये उमटताना दिसतात त्यामुळे यंदाचं अधिवेशन देखिल वादळी ठरणार असल्याची चर्चा आहे. आज  पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरवण्यासाठी सल्लागार समितीची महत्त्वाची बैठक  पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा सहभाग होता.

शिवसेनेमधील बंडानंतर सत्तेत आलेल्या नव्या राजकीय समिकरणाला एक वर्ष होताच एनसीपी मध्येही त्याच पद्धतीने फूट पडली आहे. 2 जुलैला अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे या बिनखात्याच्या मंत्र्यांना कोणती जबाबदारी मिळणार तसेच अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार का? याकडेही अनेकांचं लक्ष लागलं आहे.  आज विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे या देखील उद्धव ठाकरे यांना रामराम करत एकनाथ शिंदेंचं नेतृत्त्व स्वीकारणार आहेत. नक्की वाचा: Parliament Monsoon Session 2023: संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार; UCC विधेयकासह अनेक महत्त्वपूर्ण विधेयके मांडण्यात येण्याची शक्यता .

विधिमंडळामध्ये नव्या राजकीय नाट्यानंतर विरोधी पक्ष नेता बदलण्याचा देखील कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक आमदारसंख्या असलेल्या पक्षाकडे विरोधीपक्ष नेते पद येते. विरोधी पक्षनेते पदी असलेल्या अजित पवारांनीच सत्तेत उडी घेतल्याने आता नियमानुसार कॉंग्रेसकडून कुणी विरोधी पक्षनेता म्हणून समोर येणार का? याची चर्चा आहे. मीडीयाशी बोलताना  बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये  अधिवेशनाच्या आधी महाविकास आघाडीचे नेते एकत्र बैठक घेऊ, ज्याची संख्या जास्त असेल त्याला विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळेल, असं  म्हटलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif