महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर 'बाहेरचे'.. हे विधान चूकीचं; निवडणूक उमेदवारावर टीका न करण्याचं अजित पवार यांचे आवाहन

मात्र अजित पवारांनी ट्वीटरच्या माध्यामातून उमेदवारावर टीका करू नका असं आवाहन केलं आहे.

Ajit Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चं मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्यानुसार उमेदवारांच्या आणि कर्यकर्त्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. बारामती विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवारांविरूद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर निवडणूक लढणार आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये भाजपाने अजित पवारांविरूद्ध गोपीचंद यांना तिकीट जाहीर केल्यानंतर स्थानिकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली होती. मात्र अजित पवारांनी ट्वीटरच्या माध्यामातून उमेदवारावर टीका करू नका असं आवाहन केलं आहे.

गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी पुन्हा भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांच्या उमेदवारीवरून टीकेचें राजकारण सुरू झाल्यानंतर त्यांच्यासमोर निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या अजित पवारांनीच त्यांच्यावर टीका न करण्याचं आवाहन केलं आहे. 'गोपीचंद पडळकर हे बाहेरचे आहेत, अशा पद्धतीची विधानं करणं अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे निवडणूक उमेदवारावर टीका करू नका, असं आवाहन करतो.' अशा आशयाचं ट्वीट केलं आहे.

अजित पवार Tweet  

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी काल (4 ऑक्टोबर) दिवशी उमेदवारीचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आता 21ऑक्टोबर दिवशी मतदान अअणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे.