Maharashtra Assembly Elections 2024: 'जेपी नड्डा-अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही झडती घेण्यात आली'; Uddhav Thackeray यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर

उद्धव ठाकरेंच्या या वक्त्यव्यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे.सूत्रांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व SOPs पाळल्या जात आहेत.’ नेत्यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासाबाबत आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कठोर प्रक्रिया अवलंबली जाते, असे आयोगाने म्हणतले आहे.

Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) सुप्रिमो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हेलिकॉप्टरची 24 तासांत दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली. मंगळवारी उस्मानाबादमधील औसा मतदारसंघाच्या प्रचारासाठी उद्धव आले होते. यावेळी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे हेलिकॉप्टर तपासले. यापूर्वी 11 नोव्हेंबर रोजी यवतमाळच्या वणी विमानतळावर त्यांची बॅग तपासण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या कारवाईवर उद्धव ठाकरे संतापले होते. ते म्हणाले ‘गेल्या वेळी जेव्हा पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली तेव्हा ओडिशात एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले होते. तुम्ही माझी बॅग तपासली, काही हरकत नाही, पण मोदी आणि शहा यांच्या बॅगाही तपासल्या पाहिजेत.’

उद्धव ठाकरेंच्या या वक्त्यव्यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे.सूत्रांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व SOPs पाळल्या जात आहेत.’ नेत्यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासाबाबत आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कठोर प्रक्रिया अवलंबली जाते, असे आयोगाने म्हणतले आहे.

अहवालानुसार, निवडणूक आयोगाने म्हटले आहे, ‘याआधी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली होती. 24 एप्रिल 2024 रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हेलिकॉप्टरची बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात झडती घेण्यात आली आणि 21 एप्रिल 2024 रोजी बिहारच्या कटिहार जिल्ह्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली.’ (हेही वाचा: Uddhav Thackeray's Bag Checked: उद्धव ठाकरे यांची सलग दुसऱ्या दिवशीही हेलिपॅडवर तपासली बॅग; जाहीर सभेत भडकले पक्षप्रमुख)

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी यवतमाळला पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगची झडती घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर सत्ताधारी महायुती आघाडी आणि विरोधी महाविकास आघाडी (एमव्हीए) यांच्यात खडाजंगी झाली. या व्हिडीओमध्ये ठाकरे म्हणत आहेत की, ‘तुम्ही इतर कोणत्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासल्या आहेत का? तुम्ही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मोदी आणि अमित शहा यांच्या बॅगा तपासल्या आहेत का?’ यावर अधिकाऱ्यांनी नाही असे उत्तर दिल्यावर, ‘तुम्ही मोदींच्या बॅगा तपासत असल्याचा व्हिडिओ मला पाहायला मिळाला पाहिजे’, असे ठाकरे अधिकाऱ्यांना सांगतात.