सातारा मधील गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव म्हणत शरद पवार यांच्याकडून उदयनराजे भोसले यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका

मात्र राष्ट्रवादीला रामराम करत भाजप मध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Sharad Pawar | (Photo Credits: Twitter/ ANI)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यातील काही ठिकाणचे निकाल स्पष्ट होताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद काँग्रेसचा सातारा विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूकीसाठी फार मेहनत घेतल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा कौतुक शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रवादीला रामराम करत भाजप मध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. टीका करताना शरद पवार यांनी असे म्हटले की, सातार मधील गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभवच झाला आहे.

तसेच मतदान मोजणीच्या पार्श्वभुमीवर सातारकरांनी राष्ट्रवादीला पसंदी दिली असून श्रीनिवास पाटील यांचा बहुमताने विजय झाला आहे. त्यामुळे जमल्यास उद्याच सातार वासियांचे आभार मानणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. एवढेच नाही सातारच्या गादीबाबत सर्वांना आदर आहे पण काहींनी त्याचा अनादर केला. असे असले तरीही पक्षांतरामुळे भाजपला जनतेने धडा शिकवला असून त्यांना पसंदी दिलेली नाही. 220 के पार जनतेने स्विकारले नाही. तसेच जनतेला सरकारचा उन्माद पटलेला ही नाही. त्यामुळे सत्ता येते आणि येते सुद्धा परंतु पाय मात्र नेहमीच जमिनीवर असावे असा टोला भाजपला लगावला आहे. मात्र येत्या काळात व्यापक स्वरुपात नव्या पिढीला सामील करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.(उदयनराजेंना मोठा धक्का ! पिछाडीची बातमी कळताच झाले भावुक)

दुसऱ्या बाजूला साताऱ्यामधून उदयनराजे पिछाडीवर असल्याचे कळताच ते भावूक झाल्याचे दिसून आले. यापूर्वी सुद्धा शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशाबाबत एक ही शब्द बोलले नाहीत. मात्र आज त्यांचा झालेला पराभव पाहून त्यांनी चांगलाच टोला उदयनराजे यांना लगावला आहे. महाराष्ट्रात 288 जागांवर विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. त्याचे निकाल आज संध्याकाळ पर्यंत स्पष्ट होणार असून कोणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागून राहिले आहेत.