Maharashtra Assembly Elections 2019: धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, नमिता मुंदडा सह 5 जणांना NCP कडून उमेदावारी जाहीर; शरद पवार यांच्याकडून बीड मध्ये घोषणा

यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे , गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडित, केज मतदारसंघात नमिता मुंदडा, बीड मतदार संघात संदीप क्षीरसागर आणि माजलगाव मतदार संघात प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Ncp Chief Sharad Pawar | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या तारखा आता काही तासांतच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांनी पहिली यादी जाहीर केली आहे. बीडमध्ये शरद पवार यांनी 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) , गेवराई मतदारसंघात विजयसिंह पंडित, केज मतदारसंघात नमिता मुंदडा, बीड मतदार संघात संदीप क्षीरसागर आणि माजलगाव मतदार संघात प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आष्टी या मतदारसंघातील उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचंदेखील यावेळेस शरद पवारांनी सांगितले आहे. Maharashtra Assembly Elections 2019 Dates: महाराष्ट्र्र विधानसभा निवडणुक तारखा आज जाहीर होण्याची शक्यता;निवडणूक आयोग आयुक्तांच्या उपस्थितीत पार पडणार पत्रकार परिषद

शरद पवार सध्या बीड दौर्‍यावर आहेत. दरम्यान त्यांनी आज निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वी पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीची आता अस्तित्त्वाची लढाई होणार आहे. 2014 मध्ये बीडमधून राष्ट्रवादीकडून जयदत्त क्षीरसागर निवडून आले होते. मात्र आता ते देखील शिवसेनेत आहेत. तर परळीमध्ये पुन्हा भाजपाच्या पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे ही भावा-बहीणीची जोडी निवडणूकीच्या रिंगणात एकमेकांना टक्कर देणार आहे. सध्या धनंजय मुंडे हे विधानपरिषद विरोधी पक्षनेते आहेत. आज शरद पवार नावांची यादी जाहीर करताना ते देखील स्टेजवर उपस्थित होते.

NCP Tweet

शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. या दौर्‍यातून कमजोर झालेल्या राष्ट्रवादीला पुन्हा उभारी मिळणार का? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.