नालासोपारा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्यावर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप, कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
मात्र त्यांनी आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
विधासभा निवडणूका येत्या 21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात पार पडणार आहेत. याच परिस्थितीत नालासोपारा (Nalasopara) मध्ये बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aaghadi) आणि शिवसेना(Shiv Sena) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले आहे. या दोघांमधील वाद एवढ्या टोकाला गेला की पोलिसांनी हस्तक्षेप करत या दोघांना बाजूला केले. नालासोपाऱ्याच्या काही ठिकाणी सैनिक तैनात केले आहे. तसेच जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. खरंतर नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी एनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना उमेदावरी देण्यात आली आहे. मात्र त्यांनी आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडी यांचे म्हणणे आहे की, प्रदीप शर्मा यांनी मतदारांना मत देण्यासाठी पैसे वाटले असल्याचा आरोप लावला आहे.
शनिवारी प्रचारसभांच्या तोफा थंडावल्या आहेत. शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा हे नालासोपाऱ्यातील निलेगाव येथे आले होते. त्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला घेरले. तसेच त्यावेळी पाच गाड्या घेऊन आलेले प्रदीप शर्मा यांनी स्थानिकांना मत देण्याच्या नावाखाली पैसे वाटल्याचा आरोप लावला.या प्रकरणी पोलिसांकडे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तपासणी करण्यास सांगितले. कार्यकर्त्यांनी प्रदीप शर्मा यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या गाड्यांमधून पैसे आणून वाटल्याचे सांगितले. यामुळे शिवसेना आणि बहुजन पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद सुरु झाला.(Maharashtra Assembly Elections 2019: शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या प्रचाराचे 'शेर आया, शेर आया' रॅप साँग व्हायरल; पहा व्हिडीओ)
नालासोपाऱ्यातील हितेंद्र ठाकूर यांचे सुपु्त्र क्षीतिज ठाकूर यांना बहुजन वकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेकडून प्रदीप शर्मा यांना तिकिट देण्यात आले आहे. क्षीतिज ठाकूर नालासोपाऱ्यात आतापर्यंत दोन वेळा आमदार राहिले आहेत. तर हितेंद्र ठाकूर हे वसईतून निवडणूक लढवत आहेत. नालासोपारा, वसई आणि विरार येथे हितेंद्र ठाकूर यांचा गेल्या 30 वर्षापासून दबदबा कायम राहिला आहे. त्यामुळेच आता शिवसेनेकडून त्यांची सत्ता येथे स्थापन करण्यासाठी प्रदीप शर्मा यांना रिंगणात उतवरण्यात आले आहे.