विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेला 144 जागा न दिल्यास भाजप सोबत युती तुटण्याची शक्यता, दिवाकर रावते यांच्या विधानाने खळबळ
तसेच राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षातील नेतेमंडळींची इनकमिंग सुद्धा भाजप-शिवसेना युतीमध्ये सुरु आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Assembly Elections) तारीख अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरीही राजकीय घौडदौड सुरु झाली आहे. तसेच राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षातील नेतेमंडळींची इनकमिंग सुद्धा भाजप-शिवसेना युतीमध्ये सुरु आहे. परंतु विधानसभा निवडणूकीसाठी भाजप (BJP)-शिवसेना (Shiv Sena) युतीमध्ये जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरवण्यात आलेला नाही. याच पार्श्वभुमीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी मोठे विधान केले असून त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे.
दिवाकर रावते यांनी एबीपी माझा यांना दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणूकीत जर शिवसेनेला 144 जागा न दिल्यास युती तुटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचसोबत शिवसेनेला 288 पैकी 144 जागा देण्याचे आश्वासन भाजप कडून देण्यात आले होते. परंतु भाजपकडून शिवसेनेला अपेक्षा असलेल्या जागा नाही दिल्यास युतीबाबत प्रश्न उभा राहू शकतो असे ही दिवाकर रावते यांनी म्हटले आहे.(Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेनेला भाजपाने दिलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला पटणार?)
तर काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लवकरत विधानसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल असे म्हटले होते. परंतु अद्याप आठवडा उलटून गेला असला तरीही याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. तर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीवेळी शिवसेनेला 150 जागांपेक्षा कमी जागा देणे अमान्य होते. त्यामुळे यंदाच्या ही निवडणूकीत त्यासारखाच फॉर्म्युला शिवसेना वापरत आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून शिवसेनेला 128 जागा विधानसभेसाठी देण्यात येत आहेत. मात्र यावर शिवसेनेने विरोध केला आहे.