महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: काँग्रेस पक्षाचा आज प्रचारसभेच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक जाणून घ्या

याच पार्श्वभुमीवर आज काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रचारभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Congress flags | Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून त्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सभा घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर आज काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी प्रचारभा आयोजित करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या आज एकूण मुंबईसह महाराष्ट्रीतल 5 विविध ठिकाणी प्रचारसभा पार पडणार आहेत.काँग्रेस पक्षातील ज्योतिरादित्य सिंधिया, मल्लिकार्जुन खर्गे, आनंद शर्मा, राजीव सातव, खासदार हुसेन दलाई आणि शकील अहमद यांच्या प्रचारसभा आज होणार आहेत. त्यामुळे आजच्या प्रचारसभेत कोणत्या मुद्द्यावरुन आरोपप्रत्यारोप करण्यात येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

तर जाणून घ्या काँग्रेस पक्षाच्या आज प्रचारसभेचे वेळापत्रक:

>>मा. श्री. ज्योतिरादित्य सिंधिया

दुपारी- 1.45 वा. कोल्हापूर येथे प्रचार सभा

दुपारी- 3.30 वा. पलूस कडेगाव सांगली येथे प्रचारसभा

>>अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे

सकाळी- 11 वा. उमरगा जि. उस्मानाबाद येथे प्रचार सभा

दुपारी- 1.45 वा. अक्कलकोट जि. सोलापूर येथे प्रचार सभा

दुपारी- 3 वा. सोलापूर येथे प्रचारसभा

>>मा. आनंद शर्मा

दुपारी- 2 वा. पत्रकार परिषद मुंबई काँग्रेस कार्यालय आझाद मैदान

सायंकाळी- 7 वा. कांदिवली ईस्ट येथे प्रचार सभा

>>अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव राजीव सातव व खा. हुसेन दलवाई

दुपारी- 12 वा. वाशीम येथे प्रचार सभा

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव शकील अहमद

सायंकाळी- 7 वा. भिवंडी येथे प्रचारसभा

(पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अंबानी, अदानी यांचे लाऊड स्पिकर: राहुल गांधी)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.