महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी कणकवली येथे भाजपचे नितेश राणे यांच्या विरुद्ध शिवसेनेचे सतीश सावंत यांना उमेदवारी जाहीर, युतीत वादाची ठिगणी

तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून (Shiv Sena) राणे यांची साथ सोडलेले सतीश सावंत (Satish Sawant) यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे.

नितेश राणे विरुद्ध सतीश सावंत (Photo Credits-File/Facebook Image)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Elections) येत्या 21 ऑक्टोंबरला पार पडणार आहेत. तर आज (4 ऑक्टोंबर) निवडणूकीसाठी तिकिट देण्यात आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख होती. याच पार्श्वभुमीवर सिंधुदुर्गमधील कणकवली (Kankavli) येथून भाजपने (BJP) माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून (Shiv Sena) राणे यांची साथ सोडलेले सतीश सावंत (Satish Sawant) यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. या प्रकारामुळे आता शिवसेना-भाजप युतीत वादाची ठिगणी उडाली असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

सतीश सावंत यांनी शिवसेनेकडून एबी फॉर्म दिल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर गुरुवारी नितेश राणे यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नितेश राणे यांनी भाजपकडून कणकवली येथून उमेदवारी अर्ज भरला आहे. यानंतर सिंधुदुर्गात राणे यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार उभा केल्याने धुमशान होणार आहे. याबाबत महाराष्ट्र टाइम्स यांनी अधिक वृत्त दिले आहे. (Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, दिग्गजांना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी)

सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांचा पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीचा वैतागूव सावंत यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच सावंत यांचा कणकवलीमधील ग्रामीण भागात दबदबा असून त्यांचे मोठ्या प्रमाणात समर्थक ही आहेत. एवढेच नाही तर सावंत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सुद्धा पदाचा त्याग केला होता.

नितेश राणे यांना कणवली येथून उमेदवारी देण्यात यावी अशी नारायण राणे यांची इच्छा होती. तर नारायण राणे यांची ही इच्छा पूर्ण झाली असून अखेर त्यांना कणकवली मतदारसंघातून उमेदवारी भाजपकडून दिली आहे. नितेश राणे यांनी 2014 मध्ये विधानसभा निवडणूकीवेळी काँग्रेसकडून त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी नितेश राणे यांनी भाजप आमदार प्रमोद जठार यांना हरवत विजय मिळवला होता. तर नारायण राणे यांनी स्थापन केलेला स्वाभिमानी पक्ष ही भाजपात विलिन करणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. मात्र फक्त नितेश राणे यांचाच भाजपात प्रवेश केला आहे.