महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019: 'हे' 5 उमेदवार ठरत आहेत भाजप-शिवसेना महायुतीसाठी डोकेदुखी
सध्याच्या ट्रेंडनुसार भाजपचे अनेक दिग्गज नेते आपापल्या मतदासंघातून पिछाडीवर आहे आणि त्यांचा पराभव होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजप-सेनेच्या महायुतीची डोकेदुखी ठरत आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) दोन दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अनेक राज्यच लक्ष राज्याच्या निकालाकडे लागले आहे. देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्रावर कोणाची सत्ता असेल याचा फैसला सध्या सुरु असलेल्या मतमोजणीनंतर होणार आहे. सध्याच्या निकालानुसार 288 जागांचे कल हे भाजप (BJP)-शिवसेनेच्या (Shivsena) महायुतीकडे लागले आहे. पहिल्या काही फेरीच्या निकालानंतर भाजपला 105, शिवसेना 71, काँग्रेस 43 तर राष्ट्रवादीला 50 जागांवर आघाडी मिळाली आहे. सध्या सर्वांचे लक्ष लागून आहे ते मुंबईच्या वरळी मतदारसंघाकडे. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य (Aaditya Thackeray) पहिले ठाकरे म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. (Maharashtra VVIP Seat Update: जाणून घ्या महाराष्ट्रातील 'या' महत्वाच्या जागी कोण आहे आघाडीवर)
यंदाच्या एक्सिट पोलनुसार भाजप-सेनेच्या महायुतीला सर्वात मोठे यश मिळण्याचे भाकीत वर्तवले जात होते. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळतील असं एक्सिट पोलने वर्तवले होते. मात्र, सध्याच्या ट्रेंडनुसार भाजपचे अनेक दिग्गज नेते आपापल्या मतदासंघातून पिछाडीवर आहे आणि त्यांचा पराभव होणे जवळपास निश्चित मानले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते भाजप-सेनेच्या महायुतीची डोकेदुखी ठरत आहे.
पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे
परळी मतदारसंघात दोन बंधूंमध्ये काटेची टक्कर पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आघाडीवर आहेत. मुंडे यांनी चुलत बहीण आणि भाजप उमेदवर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना त्यांनी मागे टाकलंय. धनंजय मुंडे यांनी मतमोजणीत 18,000 हजार मतांची मोठी आघाडी घेतलीय. भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा बीड यंदा भाजपच्या हातून जाताना दिसत आहे.
उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील
देशातील लोकसभा पोटनिवडणुकीत मतमोजणीचा ट्रेंड येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुक भाजपसाठी मोठा नाराजीपूर्ण निकाल घेऊन आली आहे. भारतीय जनता पक्षाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे श्रीनिवास पाटील यांना 32,000 मतांची आघाडी मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 13 व्या पिढीतून आलेले उदयन यांनी राष्ट्रवादी सोडून काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अमल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ऋतुराज पाटील चौथ्या फेरीनंतर भाजपच्या अमल महाडिक यांना पिछाडीवर टाकत आघाडीवर पोहचले आहे. पाटील यांना चौथ्या फेरीनंतर 7613 मतं, तर महाडिक यांना 5658 मतं मिळाली आहेत.
राम शिंदे विरुद्ध रोहित पवार
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वारस म्हणून पहिले जाणारे रोहित पाव यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून मोठी आघाडी मिळवली आहे. या मतदार संघात रोहितचा विजय निश्चित मानला जात आहे. रोहितने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार रॅम शिंदे यांना कडवी झुंज दिली आहे. रोहितला 9,428 मतांची आघाडी मिळाली आहे.
बाळा भेगडे विरुद्ध सुनील शेळके
भारतीय जनता पक्षासाठी अजून एक धक्का म्हणजे राष्ट्रवादीचे नेते सुनील शेळके यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. शेळकेने सातव्या फेरीनंतर 27, 210 मतांची आघाडी मिळवली आहे. मावळ मतदारसंघातून एकूण सात उमेदवार रिंगणात होते, पण खरी चुरस राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये होती. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत भेगडे आमदार म्हणून निवडून आले होते. आणि आता ते तिसऱ्या निवडणूक लढवत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फडणवीस सरकारचे 6 मंत्री मतमोजणीत पिछाडीवर आहेत.यात, पंकजा मुंडे, राम शिंदे, औरंगाबाद मतदारसंघातून अतुल साबवे, बावळ ऊर्फ संजय विश्वनाथ भिडे, यवतमाळमधून मदन येरावार आणि पुरंदरचे विजय शिवतारे या दोघेजणांचा समावेश आहे. सकाळी 11वाजेपर्यंत भाजपला 103, शिवसेना 61, काँग्रेस 41 आणि राष्ट्रवादीने 52 जागांवर आघाडी मिळवली आहे.