Maharashtra Anganwadi Recruitment 2023: अंगणवाडी भरती फॉर्म 2023 महाराष्ट्र, कसा भराल? घ्या जाणून

त्यामुळे या घटकांच्या असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकारने भरती काढली आहे. ही भरती एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प यांच्या अधिनस्त असलेल्या विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

Job | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Maharashtra Anganwadi Bharti Form 2023: अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस हे गाव आणि शहर पातळीवर सक्रीय असणारा एक महत्त्वाचा घटक. त्यामुळे या घटकांच्या असलेल्या रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकारने भरती काढली आहे. ही भरती एकात्मिक बाल विकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प यांच्या अधिनस्त असलेल्या विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. प्राप्त माहितीनुसार विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने ही भरती निघाली आहेत. यातील काही अंगणवाडी मदतनीस भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती आम्ही येथे देत आहोत. खास करुन अंगणवाडी भरती अर्ज 2023 इथे देत आहोत.

उमेदवारांना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समिती कार्यालयात अर्ज उपलब्ध होतात. जाहिरातीत असलेल्या उल्लेखानुसार उमेदवारांनी 15 दिवसांमध्ये आपले अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह खास करुन शैक्षणिक पात्रतेसह विहीत नमुन्यात जमा करावेत. प्राप्त अर्जांवर बालकल्याण अधिकारी छाननी करतात आणि गुणवत्तेवर आधारीत यादी प्रसिद्ध करतात. शेजारच्या बालकल्याण अधिकारी या यादीची पडताळणी करतात. त्यानंतर प्रसिद्ध यादीवर काही प्रश्न कोणाला आक्षेप असतील तर त्यावरच्या हरकती मागवून उमेदवारांच्या अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी वयाची अट अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत 18 ते 35 या दरम्यान असावे. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असेल. नोकरीचे ठिकाण हे उमेदवाराचे स्थानिक ठिकाण/गाव असेल. (हेही वाचा, 7th Pay Commission DA Hike: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या सुरुवातीलाचं मिळालं मोठं गिफ्ट; महागाई भत्ता झाला निश्चित)

कसा करा अर्ज?

अंगणवाडी सेविका अर्ज भरण्यासाठी एकात्मिक बाल विकास सेवा महाराष्ट्र विभागा ची अधिकृत वेबसाइट उघडा. त्यावर अंगणवाडी भरती संदर्भात जी अधिकृत लिंक दिसेल त्यावर क्लिक करा. लिंक ओपन होताच नियम, अटी, पात्रता यांविषयी माहिती असेल. ती वाचा. त्यानुसार अर्ज भरण्यास सुरुवात करा. अर्ज भरताना आपले नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, पत्ता आणि मोबाईल नंबर, ईमेल आयडी, शैक्षणिक पात्रता यांबाबत माहिती द्या. अर्ज बिनचूनक भरा. लिंकवर मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पात्रता, कागदपत्रे आणि इतर सर्व बाबी भरल्या आहेत. त्याची काळजीपूर्व खात्री करा. आणि सबमीट बटणारव क्लिक करुन फॉर्म भरल्याची प्रिंट घ्या. उमेदवार गुणवत्तेच्या आधारे निवडला जाईल.