महाराष्ट्र: मुंबई पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचे गेल्या 24 तासात Coronavirus मुळे निधन
महाराष्ट्रात मुंबईतील पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचा गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे
देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा (Coronavirus) आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा पाचवा टप्पा येत्या 30 जून पर्यंत कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कोविड वॉरिअर्स आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत. याच दररम्यान आता एक वाईट बातमी समोर आली आहे. तर महाराष्ट्रात मुंबईतील पोलीस दलातील 4 कर्मचाऱ्यांचा गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.(महाराष्ट्र: COVID19 च्या चाचणीसाठी नागरिकांना आता 4400 रुपयांऐवजी 2200 रुपये मोजावे लागणार, राज्य सरकारचा निर्णय)
शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारी नुसार महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 3388 जणांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे. तसेच 36 जणांचा मृत्यू झाला असून 1945 जणांची प्रकृती सुधारल्याची माहिती देण्यात आली होती. तर वयाच्या 55 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले महाराष्ट्र पोलीस दलातील कर्मचारी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर काम करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(पुणे: येरवडा जेल मधून दोन कैदी फरार; सोशल डिस्टंसिंग साठी उभारलेल्या तुरुंगाच्या शौचालायच्या खिडकीचा घेतला फायदा)
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 101141 वर पोहचला असून 3717 जणांचा बळी गेला आहे. राज्यातील पुण्याच्या पाठोपाठ मुंबईतील रुग्णांचा अधिक समावेश आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकार सतत जनजागृती करूनही नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे राज्यात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. प्रशासनाकडून कडक कायदे करूनही लोकांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.