Mahaparinirvan Divas 2024 Suburban Special Trains: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 5 व 6 डिसेंबरच्या मध्यरात्री चालवणार 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक

यात कुर्ला-परळ विशेष लोकल ट्रेनचा समावेश आहे, जी कुर्ला येथून सकाळी 00.45 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता परळला पोहोचेल. त्याशिवाय कल्याण-परळ ही विशेष लोकल सकाळी 01.00 वाजता कल्याणहून सुटेल आणि 02.15 वाजता परळला पोहोचेल.

Mumbai Local (फोटो सौजन्य - फेसबुक)

Mahaparinirvan Divas 2024 Suburban Special Trains: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Divas 2024) प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे (Central Railway) 5 व 6 डिसेंबर 2024च्या मध्यरात्री (गुरुवार-शुक्रवार मध्यरात्री) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबून धावतील. यात कुर्ला-परळ विशेष लोकल ट्रेनचा समावेश आहे, जी कुर्ला येथून सकाळी 00.45 वाजता सुटेल आणि 01.05 वाजता परळला पोहोचेल. त्याशिवाय कल्याण-परळ ही विशेष लोकल सकाळी 01.00 वाजता कल्याणहून सुटेल आणि 02.15 वाजता परळला पोहोचेल. त्याचप्रमाणे ठाणे-परळ विशेष लोकल ट्रेन ठाणे येथून पहाटे 02.10 वाजता सुटेल आणि परळ येथे पहाटे 02.55 वाजता पोहोचेल.

डाऊन दिशेने परळ-ठाणे ही विशेष लोकल सकाळी 01.15 वाजता परळहून सुटेल आणि 01.55 वाजता ठाण्याला पोहोचेल. परळ-कल्याण विशेष लोकल 02.25 वाजता परळहून सुटून पहाटे 03.40 वाजता कल्याणला पोहोचेल आणि परळ-कुर्ला विशेष लोकल पहाटे 03.05 वाजता परळहून सुटेल आणि कुर्ला येथे पहाटे 03.20 वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर, वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीहून सकाळी 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे पहाटे 02.10 वाजता पोहोचेल. पनवेल-कुर्ला विशेष लोकल पनवेलहून सकाळी 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ल्याला पहाटे 02.45 वाजता पोहोचेल आणि वाशी-कुर्ला विशेष लोकल वाशीपासून 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे पहाटे 03.40 वाजता पोहोचेल. (हेही वाचा: Mahaparinirvan Din 2024 Special Trains: महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे चालवणार 12 अनारक्षित विशेष फेर्‍या; पहा तपशील)

डाऊन दिशेने कुर्ला-वाशी स्पेशल ट्रेन कुर्ला येथून पहाटे 02.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे पहाटे 03.00 वाजता पोहोचेल. कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून पहाटे 03.00 वाजता सुटून पनवेलला पहाटे 04.00 वाजता पोहोचेल आणि कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ला येथून पहाटे 04.00 वाजता सुटेल आणि वाशीला पहाटे 04.35 वाजता पोहोचेल.