Maha Vikas Aghadi Seat Sharing: चर्चेचं गुऱ्हाळ संपलं; शेवटी 'मविआ'चे जागावाटप ठरलं; काँग्रेस, शिवसेना (UBT), NCP (SS) कसे लढणार? घ्या जाणून

वाट्याला आलेल्या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उर्वरीत 8 जगा मित्रक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

Maha Vikas Aghadi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Assembly Election 2024: विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेनुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (29 ऑक्टोबर) आज शेवटचा दिवस होता. दरम्यान, महाविकासआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागा वाटपांवरुन (Maha Vikas Aghadi Seat Sharing) सुरु असलेले चर्चेचे गुऱ्हाळ शेवटपर्यंत सुरुच राहिले. अखेर उमेदवारी दाखल करण्याची वेळ उलटून गेल्यामुळे एबी फॉर्म सोबत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संख्येवरुन या आघाडीतील घटक पक्ष किती जागा लढणार हे अखेर स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय काँग्रेस (Congress), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा शिवसेना (UBT) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षामध्ये रस्सीखेच हती.

महाविकासआघाडीतील घटक पक्षांनी आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. पण ते देत असतान एकाच मतदारसंघात महाविकासआघाडीचे दोन उमेदवार उभे असल्याचे पाहाला मिळते. त्यामुळे या ठिकाणी मैत्रिपूर्ण लढती होणार की, छाननी नंतरही उमेदवारी अर्ज मागे घेतले जाणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, घटक पक्षांनी एबी फॉर्म दिल्याच्या संख्येवरुन पुढे येणाऱ्या एकूण जागा खालील प्रमाणे:

शिवसेना (UBT): 96 जागा

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षाने एकूण 96 एबी फॉर्म दिले आहेत. जे उमेदवारांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत जोडले आहेत. त्यानुसार हा पक्ष महाविकासआघाडीतील दुसऱ्या क्रामांकाचा पक्ष ठरला आहे. (हेही वाचा, Baramati Vidhan Sabha: शरद पवार यांनी केली अजित पवार यांची नक्कल; सभेत पिकला हशा, जोरदार घोषणाबाजी)

राष्ट्रीय काँग्रेस: 102 जागा

पंजा या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या 102 उमेदवारांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे त्यामुळे सेना आणि काँग्रेस वगळून इतर राहिलेल्या इतर जागांवर शरद पवार यांचा पक्ष निवडणूक लढतो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (SP): 87 जागा

शरद पवार यांचा पक्ष विधानसभा निवडणूक 2024 ला सामोरे जात असतान महाविकासआघाडीमध्ये सर्वात कमी जागा लढवणारा पक्ष ठरला आहे. या पक्षाने एकूण 87 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. (हेही वाचा, Baramati Assembly Constituency: बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार, युगेंद्र पवार यांच्याकडून अर्ज दाखल)

मित्रपक्षांसाठी 8 जागा?

दरम्यान, एकूण 288 पैकी काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांच्या एकूण जागांची बेरीज केली तर ती 280 इतकी होते. त्यामुळे उर्वरी 8 जागा मित्रपक्षांना सोडली जाण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय असे की, काही जागांवर दोन्ही मित्रपक्षांनी उमेदवारी दाखल केली आहे. दोन्ही पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या जागा खालीलप्रमाणे:

मिरज: शिवसेना ठाकरे गट-तानाजी सातपुते, काँग्रेस - मोहन वनखंडे

सांगोला: शिवसेना ठाकरे गट दीपक आबा साळुंखे, शेकाप - बाबासाहेब देशमुख

दक्षिण सोलापूर: काँग्रेस - दिलीप माने, शिवसेना ठाकरे गट: अमर पाटील

पंढरपूर: काँग्रेस भागीरथ भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष- अनिल सावंत

परांडा: शिवसेना ठाकरे गट रणजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष -राहुल मोटे

शिवसेना ठाकरे गट - पवन जैस्वाल, काँग्रेस -माणिकराव ठाकरे

दरम्यान, उमेदवारी दाखल करुन किंवा ती दाखल करण्यासाठी पक्षाकडून एबी फॉर्म मिळेल यासाठी आशेवर बसलेल्या अनेकांचा हिरमोड जाला आहे. शेवच्या क्षणी एबी फॉर्मच न आल्याने अनेक उमेदवारांनी पक्षनेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे.