महाविकास आघाडीची घोषणा; सतेज पाटील कोल्हापूर तर, विश्वजीत कदम भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री
दरम्यान, सतेज पाटील (Satej Patil) यांना कोल्हापूर (Kolhapur)तर, विश्वजीत कदम (Vishwajeet Patangrao Kadam) यांच्यावर भंडारा (Bhandara) जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) सरकारने नुकतीच नवीन पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. दरम्यान, सतेज पाटील (Satej Patil) यांना कोल्हापूर (Kolhapur)तर, विश्वजीत कदम (Vishwajeet Patangrao Kadam) यांच्यावर भंडारा (Bhandara) जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपण्यात आली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, पालकमंत्री कोण होणार? याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरचे पालकमंत्रिपदआपल्याला मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, यामध्ये अखेर सतेज पाटलांनी बाजी मारली.
महाविकास आघाडीने गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. त्यावेळी पहिल्या यादीत शिवसेनेचे 13, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 12 तर, काँग्रेस पक्षाकडे 11 पालकमंत्रीपद आली होती. यातच महाविकास आघाडीने नुकतीच आपल्या दोन नव्या पालकमंत्र्यांची घोषणा केली आहे. यात कोल्हापूर मधून सतेज पाटील यांना तर, भंडारा जिल्ह्यातून विश्वजीत कदम यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे देखील वाचा- सातारा: शरद पवार यांचे उदयनराजे भोसले यांना प्रत्युत्तर, 'मी कधीच म्हटलो नाही मला जाणता राजा म्हणा'
सतेज पाटील यांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री होणार असल्याचे सूचक विधान केले होते. तर, कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांचा हक्क आहे, असे त्यांचे समर्थक म्हणाले होते. मात्र, सुरुवातीला प्रत्यक्षात पालकमंत्रीपदाचे वाटप करण्यात आले होते. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली होती. तसेच कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हे काँग्रेसच्या वाट्याचे आहे, राष्ट्रवादीला ते सोडणार नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ठरलेल्या नियमानुसार कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हे काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना मिळाले आहे.