Raj Thackeray in Pune: हनुमान जयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुणे येथे महाआरती
मशिदींवरील भोंगे उतरवा अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुणे (Pune) येथे महाआरती (Maha Aarti) होणार आहे. राज्यभरात आज (16 एप्रिल) हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो आहे. या उत्सवाचे औचित्य साधत राज ठाकरे पुण्यात महाआरती करणार आहेत.
मशिदींवरील भोंगे उतरवा अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या मनसे (MNS ) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पुणे (Pune) येथे महाआरती (Maha Aarti) होणार आहे. राज्यभरात आज (16 एप्रिल) हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होतो आहे. या उत्सवाचे औचित्य साधत राज ठाकरे पुण्यात महाआरती करणार आहेत. दरम्यान, महाआरतीच्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुणे येथे कालच दाखल झाले आहेत. पुणे येथी खालकर चौक परिसरात असलेल्या हनुमान जयंतीचे (Hanuman Jayanti) औचित्य साधत मारुती मंदिरात ही मआआरती पार पडेल. मशिदींवरील भोंगे हटविण्यासाठी मनसेने पुकारलेल्या आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचा अर्थ या महाआरतीतून काढला जातो आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरुन सुरुवातील मुंबई त्यानंतर ठाण्यात भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता पुण्यातही राज ठाकरे अशीच भूमिका मांडण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणे येथून मशिदींवरील घेतलेल्या भोंग्यांवरु राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले. इतके की थेट मनसेतही चलबिचल सुरु झाली. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनामे दिले. त्यामुळे आगामी काळातही राज ठाकरे यांनी ही भूमिका कायम ठेवल्यास त्याचा पक्षाला किती फटका बसतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या तीन मे पर्यंत मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा मनसे हनुमानचालीसा पटण करेन असा जाहीर इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.त्यामुळे राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे सामाजिक वातावरण कसे राहते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Raj Thackeray: आमचे राजकारण मिमिक्रीवर अवलंबून नाही असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंच्या टीकेला दिले प्रत्यूत्तर)
दरम्यान, पाठीमागील काही दिवसांपासून राज ठाकरे बरेच सक्रीय झाले आहेत. मुंबईतल सभेनंतर त्यांनी अवघ्या आठवडाभरात ठाणे येथे उत्तर सभा घेतली. त्यानंतर लगेच पुढच्या आठवड्यात आज ते पुणे येथे आहेत. राज ठाकरे हे चार सहा महिन्यांतून एकदा सभा घेतात आणि गायब होतात, अशी टीका शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरे यांचे सक्रीय होणे याला अनेक अर्थ आहेत. दरम्यान, पुणे येथे राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)